मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री सीमा देव यांचे आज (गुरुवार, दिनांक 24 ऑगस्ट) निधन झाले आहे. त्यांच्या निधनाने मराठी मनोरंजनसृष्टीवर शोककळा पसरली आहे. अभिनेत्री सीमा देव यांचे आज सकाळी दीर्घ आजाराने निधन झालं. वयाच्या 81 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिवंगत अभिनेते रमेश देव यांच्या त्या पत्नी होत्या. ( Veteran Actress Seema Dev Passes Away at age 81 )
चित्रपटांमध्ये सीमा देव यांनी आपल्या अभिनयाचा खास ठसा उमटवला होता. सीमा देव या मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील जेष्ठ अभिनेत्री होत्या. त्यांनी आतापर्यंत 80 पेक्षा जास्त मराठी आणि हिंदी चित्रपटांत काम केलं. काही काळानंतर त्यांनी हिंदी चित्रपटांत काम करणे बंद करून केवळ मराठी चित्रपटांत काम करायला सुरुवात केली होती. आपल्या बहारदार अभिनयाने त्यांनी मराठी चित्रपटसृष्टीत एक वेगळाच ठसा उमटवला.
2013 मध्ये रमेश देव आणि सीमा देव यांनी लग्नाचा पन्नासावा वाढदिवस साजरा केला होता. गेल्या वर्षी म्हणजेच 2022 साली रमेश देव यांचे निधन झाले. त्यानंतर आज सीमा देव यांचे प्रदीर्घ आजाराने निधन झाले. ( Veteran Actress Seema Dev Passes Away at age 81 )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– सह्याद्रीचा दुर्गसेवक हरपला! अमित जाचक यांचे इंदुरीजवळ अपघाती निधन, मावळ तालुक्यातील युवावर्गावर शोककळा
– “चंदा मामा अब नहीं दूर, चंदा मामा की बस एक टूर” – पंतप्रधान नरेंद्र मोदी; असं झालं चंद्रावर चंद्रयानाचं लँडिंग, जाणून घ्या
– मावळ तालुक्यातील धरणग्रस्तांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत मंत्रालयात बैठक; ‘आता ही शेवटची मिटींग, महिन्यात निर्णय झाला नाही तर…’