Dainik Maval News : श्रीरामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे (Talegaon Dabhade) येथे आयोजित केलेल्या मिरवणुकीत मल्लखांब खेळत असताना त्यावर आगीसंबंधी प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. परंतु हे प्रात्यक्षिक दाखवित असताना एक तरुण भाजला. ही घटना रविवारी, 6 एप्रिल रोजी सायंकाळी मारुती मंदिर चौक, तळेगाव दाभाडे येथे घडली होती. याप्रकरणी आता दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरज सुरेश थोरात (वय 25, सोमाटणे, मावळ), शिवम सुधीर कासार (वय 20, कोथरूड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलीस अंमलदार कृष्णा कातकडे यांनी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रामनवमी निमित्त तळेगाव दाभाडे येथे मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीमध्ये तलवारबाजी आणि आगीसंबंधी प्रात्यक्षिक करण्यास पोलिसांनी बंदी घातली होती. तरी देखील आयोजक सुरज थोरात याने मल्लखांब करणारा तरुण शिवम कसार याला आगीबाबत प्रात्यक्षिक करण्यास सांगितले.
हे प्रात्यक्षिक करीत असताना शिवम याच्या चेहऱ्याला भाजले. यामध्ये तो जखमी झाला. याप्रकरणी आयोजक आणि प्रात्यक्षिक सादर करणारा अशा दोघांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates