व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, December 18, 2025
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी विजय सुराणा, मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर यांची निवड

महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई संचलित पुणे जिल्हा ग्रामीण संघाच्या कार्यकारिणीत विजय सुराणा, सचिन ठाकर यांची नियुक्ती

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 14, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Vijay Surana Sachin Thakar appointed in executive committee of Pune District Rural Association

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे संघटक संजय भोकरे, राज्य सरचिटणीस विश्वास आरोटे यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचवड विधानसभेचे आमदार शंकर जगताप यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे, राज्य समन्वयक नितिन शिंदे, पुणे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार हल्ला कृती समिती पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष सचिन चपळगावकर, राज्य सहसंपर्कप्रमुख पराग कुकुळवाल यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ मुंबई, संचलित पुणे जिल्हा ग्रामीण पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ पत्रकार विजय सुराणा, तर मावळ तालुका अध्यक्षपदी सचिन ठाकर वडगाव यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी आमदार शंकर जगताप यांनी सांगितले की, पत्रकारांच्या समस्येवर आगामी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत अत्याधुनिक तंत्रज्ञान व सुसज्ज असे पत्रकार भवन आगामी काळात वीस गुंठ्यामध्ये उभा करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. तसेच नवनिर्वाचित पदाधिकारी सर्व पत्रकारांना त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या.

प्रदेशाध्यक्ष गोविंद वाकडे यांनी सांगितले की महाराष्ट्र राज्यातील २५ हजारांपेक्षा जास्त पत्रकार हे संघटनेशी जोडले असून संपूर्ण महाराष्ट्रातील ग्रामीण व शहरी भागात पत्रकार संघाचे काम सुरू आहे. भविष्यात संघटनेतील प्रत्येक पत्रकारांना आरोग्य व शासनाच्या सोईसुविधा पुरविण्यासाठी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्रात काम सुरू आहे.तसेच संघटना मजबूत करण्यासाठी प्रयत्न केले जाईल असे आश्वासन दिले.

विजय सुराणा यांनी महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे मुंबई सर्व पदाधिकारी यांचे आभार व्यक्त करताना सांगितले की जिल्ह्यातील ग्रामीण भागातील सर्व पत्रकारच्या अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्नशील राहिल तसेच महाराष्ट्रातील सर्वात मोठे पत्रकार संघाचे अधिवेशन आगामी काळात मावळ तालुक्यात भरविले जाईल अशी ग्वाही दिली.

तसेच सचिन ठाकर यांनी सांगितले की मावळ तालुक्यातील ग्रामीण व शहरी भागातील पत्रकारांना एकत्रित करून अडीअडचणी सोडविण्यासाठी पत्रकार संघाच्या माध्यमातून प्रयत्न केला जाईल अशी ग्वाही दिली.

यावेळी जेष्ठ पत्रकार सुशिल सैदाने, राजेंद्र काळोखे, तसेच महादेव वाघमारे, धनंजय नांगरे, योगेश घोडके, अभिषेक बोडके, सुभाष भांडे, सचिन मोरे आदी पत्रकार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मिलिंद सदांण, आभार अतुल क्षिरसागर यांनी व्यक्त केले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मुंबई-पुणे दरम्यानचा ‘मिसिंग लिंक प्रकल्प’ म्हणजे अभियांत्रिकी क्षेत्रातील चमत्कार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
– अत्यंत आनंदाची बातमी! किल्ले लोहगडासह ‘या’ १२ किल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश ; शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण
– कौतुकास्पद! टाकवे गावातील रिक्षा चालकाचा मुलगा बनला सनदी लेखापाल (सीए), आई-वडिलांचा आनंद गगनात मावेना


dainik maval jahirat

Previous Post

वडगाव शहर मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सतीश गाडे, उपाध्यक्षपदी विशाल कुंभार, तर कार्याध्यक्षपदी दिलीप कांबळे यांची निवड

Next Post

मावळमधील ‘या’ दोन ठिकाणच्या शाळा अनधिकृत ; पालकांनी पाल्याचा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा – गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
school

मावळमधील 'या' दोन ठिकाणच्या शाळा अनधिकृत ; पालकांनी पाल्याचा अधिकृत शाळेतच प्रवेश घ्यावा - गटशिक्षणाधिकारी यांचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Work on 220 projects in Pune metropolitan area CM Devendra Fadnavis

Breaking : जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी अर्जाबाबत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांचा निर्णय अंतिम

December 17, 2025
Saptashati Sangam program celebrated at Blooming International School Gahunje Maval

गहुंजे येथील ब्लूमिंग इंटरनॅशनल स्कूलमध्ये सप्तशती संगम कार्यक्रम उत्साहात साजरा । Maval News

December 17, 2025
MLA Sunil Shelke held review meeting at Panchayat Samiti Maval office BDO Kuldeep Pradhan

कामात हलगर्जीपणा नको, आमदार शेळकेंची अधिकारी, ठेकेदारांना तंबी ; ‘त्या’ ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचे निर्देश

December 17, 2025
Mangrul illegal mining case Statewide agitation if suspension of revenue officers is not withdrawn

मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन मागे न घेतल्यास राज्यव्यापी आंदोलन ; संघटनेचा इशारा

December 17, 2025
Rooftop pub bar

वडगाव मावळ पोलिसांकडून दोन ऑर्केस्टा बार वर छापे , चौघांवर गुन्हा दाखल । Maval Crime

December 17, 2025
grand Chhakdi bullock cart competition organized by Ashatai Waikar at Karla Phata Maval

भिर्रर्रर्र… कार्ला फाटा येथे आशाताई वायकर यांच्या माध्यमातून भव्य छकडी बैलगाडा स्पर्धेचे आयोजन ; विजेत्यांवर होणार बक्षीसाची खैरात

December 17, 2025
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.