मावळ तालुका भाजपा युवा मोर्चा आणि भाजपा उत्तर भारतीय आघाडी पुणे जिल्हा यांच्या संयुक्त विद्यमाने गहुंजे येथे रविवारी (दि. 14 जुलै) मतदार नोंदणी अभियान राबविण्यात आले. गहुंजे येथील एअर मोंट सोसायटीमध्ये नवमतदारांसाठी हे अभियान राबविण्यात आले. अभियानाअंतर्गत एकूण 137 नागरिकांनी नोंदणी केली. मावळ भाजपा युवा मोर्चाचे सरचिटणीस साहेबराव बोडके-पाटील आणि पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीचे सरचिटणीस निशित अंकल सिंह यांनी या शिबिराचे आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
येत्या 25 जुलै पर्यंत हे अभियान राबविण्यात येणार असून परिसरात नवमतदारांनी आपली मतदार कार्ड नोंदणी करून घ्यावी, तसेच येणाऱ्या निवडणूकांमध्ये मतदानाचा हक्क बजवावा आणि सत्ता योग्य व्यक्तीच्या हाती द्यावी, असे आवाहन साहेबराव बोडके पाटील यांनी यावेळी केले. ( Voter registration campaign on behalf of BJP at Gahunje )
या कार्यक्रमाचे उद्घाटन पुणे जिल्हा उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष अंशुल पाठक आणि मावळ तालुका युवा मोर्चाचे अध्यक्ष नितीन मराठे यांनी केले. यावेळी गहुंजे गावचे विद्यमान सरपंच कुलदीप बोडके, ग्रामपंचायत सदस्य हिरामण आगळे, नितीन बोडके, संदीप आगळे, मावळ तालुका उत्तर भारतीय आघाडीचे अध्यक्ष संदीप राणा, गोविंद बोडके आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
अधिक वाचा –
– शेतकरी उत्पादक संघ आणि कंपन्यांना गोदाम बांधकाम अनुदानासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन – वाचा सविस्तर
– कुंडमळा येथे पर्यटनासाठी येताय ? मग हे नियम वाचून घ्या, धोकादायक पर्यटन न करण्याचे आवाहन । Indori Kundamala Waterfalls
– शाब्बास पोरी ! सानिया गपचुप हिची पदव्युत्तर शिक्षणासाठी न्यूयॉर्क विद्यापीठामध्ये निवड ; बाळा भेगडे यांच्याकडून सन्मान