मावळ तालुक्यात सध्या जोरदार पाऊस सुरु आहे. अशातच वाडीवळे जवळ इंद्रायणी नदीवर नव्या पुलाचे काम सुरु असताना ग्रामस्थ, प्रवासी यांच्याकरिता तात्पुरता स्वरुपात बांधलेला बंधारा वजा पुल हा देखील पहिल्या पावसात वाहून गेला आहे. त्यामुळे या भागातील तब्बल 9 गावांचा संपर्क तुटला आहे, अशी माहिती वाडीवळे गावचे चेतन थोरवे यांनी दैनिक मावळला दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
वाडीवळे गावातील इंद्रायणी नदीवरील पुल हा त्या पलिकडे असणाऱ्या अनेक गावांतील नागरिकांसाठी दळणवळणाचा प्रमुख मार्ग आहे. गेल्या अनेक वर्षांपासून या पुलाच्या दुरुस्तीची मागणी होत होती. अशात यंदा आमदार सुनिल शेळके यांच्या सौजन्याने हा पुल होत आहे. परंतू जून पूर्वी हा पूल पूर्ण होणे अपेक्षित असताना तो अद्याप बांधकाम अवस्थेत आहे. दुसरीकडे तात्पुरत्या स्वरुपात बांधण्यात आलेला बंधारा वजा पूल देखील आता वाहून गेल्याने अनेक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
या घटनेमुळे पंचक्रोशितील वाडीवळे वळक, बुधवडी, सांगिसे, वेल्लेवळी, नेसावे, खांडशी उंबरवाडी येथील ग्रामस्थ, शालेय विद्यार्थी, महिला आणि कामगार वर्ग आदी सर्वांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्रशासनाने ताबडतोब या ठिकाणची पाहणी करुन पर्यायी व्यवस्था करावी अशी मागणी नागरिक करत आहेत.
अधिक वाचा –
– एक रुपयात पीक विमा! योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन, ‘या’ पिकांचा समावेश, जाणून घ्या सविस्तर
– ढाक भैरी गडावर वाट चुकलेल्या पर्यटकांच्या शोधमोहिमेचा थरार!! मुसळधार पाऊस, काळाकुट्ट अंधार अन्…