जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज बीज सोहळा यंदा 9 मार्च (गुरुवार) रोजी होत आहे. संत तुकाराम महाराज वैकुंठगमन दिवस म्हणजे संत तुकाराम महाराज बीज सोहळा. या बीज सोहळ्यानिमित्त राज्याच्या कानाकोपर्यातून लाखो भाविक श्री क्षेत्र देहू इथे उपस्थित राहत असतात.
अनेक दिंड्याही राज्यभरातून या सोहळ्यासाठी येत असतात. मावळ तालुक्यातील पवनमावळ भागातून बीजोत्सवासाठी दरवर्षी दिंडी जात असते. मंगळवारी (7 मार्च) या दिंडीचे श्रीक्षेत्र देहूगाव च्या दिशेने प्रस्थान झाले. ( Warkari Dindi Departure From Pavan Maval Pavananagar Towards Dehu For Tukaram Maharaj Beej Sohala )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील 12 वर्षांपासून पवनमावळ परिसरातून श्री क्षेत्र देहू इथे तुकाराम महाराज वैकुंठगमन सोहळ्यासाठी ( तुकाराम बीज ) हजारो भाविक ज्ञानोबा-तुकोबा जयघोष करत पायी वारी करत असतात. यंदाही श्री जगद्गुरु संतश्रेष्ठ तुकाराम महाराज दिंडी पवन मावळ या दिंडीचे प्रस्थान पवनानगर येथील ओंकार गणेश मंदिर येथून, तर वैकुंठगमन श्री संत तुकाराम महाराज दिंडी समाज पवन मावळ दिंडीचे प्रस्थान आर्डव येथील संत तुकाराम महाराज पादुका मंदिर येथून झाले.
अधिक वाचा –
– ‘आळंदी-देहूत आल्यावर मानसिक समाधान मिळतं’; तब्बल 25 वर्षांनी शरद पवारांनी घेतले तुकोबांचे दर्शन, संस्थानकडून खास सत्कार
– मावळात ढगांच्या गडगडाटासह अन् विजांच्या कडकडाटासह अवकाळी पाऊस; काही ठिकाणी गारपीट, बळीराजा संकटात