श्री विठ्ठल परिवार मावळ आणि आमदार सुनिल शेळके यांच्या वतीने कान्हे येथे आज (शनिवार, दि. 22) मावळ तालुक्यातील विणेकऱ्यांचा सन्मान समारंभ संपन्न झाला. या सन्मान सोहळ्याला संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार हभप राजाभाऊ चोपदार आणि संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष हभप पुरुषोत्तम महाराज मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘वारकरी निरपेक्ष भावनेने वारी करत असतात, त्यांना सन्मानित करणे आपल्या समाजाचे कर्तव्य आहे आणि या समाजाचे लोकप्रतिनिधी या नात्याने आमदार सुनिल शेळके ही सेवा करतात. हे नक्कीच कौतुकास्पद आहे,’ असे प्रतिपादन संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे परंपरागत चोपदार हभप राजाभाऊ चोपदार यांनी केले. ( Warkari felicitated on behalf of shri vitthal parivar maval & mla sunil shelke at kanhe )
आषाढी कार्तिकी विसरु नका मज । सांगत असे गुज पांडुरंग ॥
वरील उक्तीप्रमाणे आषाढी वारी आली की वारकऱ्यांना पंढरपुराचे वेध लागतात. लाखोंच्या संख्येने वारकरी संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यात सहभागी होत ग्यानबा-तुकारामाच्या नाम घोषात पंढरपूरकडे प्रस्थान करतात. वारीची ही परंपरा जपण्याचे काम मावळ तालुक्यातील वारकरी आजही भक्तीभावाने करीत आहेत. मावळातील प्रत्येक गावातून दिंड्या आषाढी वारीत सहभागी होत असतात. या दिंड्यांमधील विणेकऱ्यांचा योग्य सन्मान व्हावा, यासाठी आमदार सुनिल शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली हा सन्मान सोहळा दरवर्षी आयोजित करण्यात येतो.
यावेळी उद्योजक शंकरराव शेळके, सरपंच विजय सातकर, हभप नितीन काकडे, रामदास धनवे, उत्तमराव बोडके, संतोष काळोखे, मुकुंद राऊत, बाळासाहेब आडकर, बाळासाहेब जांभुळकर, दत्ता केदारी, गोपीचंद कचरे, नारायण ठाकर, दिनेश सातकर, निलेश वारिंगे आणि इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विठ्ठल परिवारचे अध्यक्ष गणेश जांभळे यांनी तर आभार लक्ष्मण सातकर यांनी मानले.
अधिक वाचा –
– खरीप पिकांच्या किमान हमी भावात (एमएसपी) वाढ ! पंतप्रधान मोदींच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय
– इतर मागासवर्ग प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण, वाचा अधिक
– हुश्श… ! मान्सून सरी बरसल्याने पवना धरणातील जलसाठा स्थिर होण्यास मदत, शुक्रवारी 55 मी.मी. पाऊस । Pavana Dam Updates