Dainik Maval News : जलजागृती सप्ताहानिमित्त गुरुवारी (दि. २०) तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने पाण्याचा वापर जपून व काटकसरीने करण्याचे आवाहन करीत नगरपरिषदेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची जलप्रतिज्ञा घेण्यात आली.
तळेगाव दाभाडे शहरामध्ये गाव आणि स्टेशन विभागामध्ये दैनंदिन पाणीपुरवठा नियमित केला जात आहे. उन्हाळयाचे सुरु झाल्याने पाणीपुरवठयामध्ये काही प्रमाणात अडचण निर्माण होत आहे. तसेच, बऱ्याचदा काही नागरिक पाण्याचा अपव्यय करताना निदर्शनास आले आहेत.
जलजागृती सप्ताह अंतर्गत नागरिकांमध्ये जलबचतीबाबत जनजागृती करुन पाणीटंचाई टाळण्याच्या हेतूने जलजागृती सप्ताह राबविण्यात येत आहे. पाण्याचा गैरवापर व अपव्यय होणार नाही याची काळजी घेतली जावी. पाण्याचा वापर गरजेपुरता व काटकसरीने करण्याचे आवाहन उपमुख्याधिकारी ममता राठोड यांनी प्रशासनाच्यावतीने केले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महसूल विभागाकडून ‘जिवंत सातबारा मोहीम’ जाहीर : 7/12 उताऱ्यावरील मयतांची नावे कमी होणार अन् वारसांची नावे लागणार
– वक्फ बोर्डाने बळकावलेल्या खासगी तसेच देवस्थानच्या जमिनी काढून घेणार ; महसूलमंत्र्यांची विधानसभेत माहिती
– घर बांधणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी ! सरकार मोफत वाळू देणार, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी घोषणा