लोणावळा शहरातील नागरिकांना शनिवार-रविवार पाणीटंचाईला सामोरे जावे लागू शकतं. नगरपरिषदेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार शनिवार पासून सोमवार पर्यंत शहरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा करुन ठेवावा लागणार आहे. परंतू लोणावळा नगरपरिषदेने अल्पावधीत दिलेल्या या सुचनेमुळे नागरिकांची तारांबळ उडण्याची शक्यता आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
काय आहे नागरिकांसाठी सुचना –
“लोणावळा नगर परिषद हद्दीतील सर्व नागरिकांना सूचित करण्यात येते की, टाटा कंपनी यांच्या वळवण धरणातीत महत्वाची दुरुस्ती करण्यात येणार असल्याने शनिवार दिनाक 18/11/2023 दुपारनंतर ते सोमवार दिनांक 20/11/2023 पर्यंत सर्व नगर परिषद हद्दीतील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणीपुरवठा झाल्यानंतर मुबलक पाणी साठा करून ठेवावा आणि नगर परिषदेला सहकार्य करावे ही विनंती.” अशी सुचना नगरपरिषदेच्या मुख्याधिकारी यांच्याकडून नागरिकांना देण्यात आली आहे. ( water supply to lonavala city will be shut off nagar parishad notice to citizens )
अधिक वाचा –
– शिंदे सरकारचा मोठा निर्णय! ग्रामपंचायत कार्यालय बांधण्यासाठी आता मिळणार 25 लाखांचा निधी, वाचा सविस्तर
– आंदर मावळातील रस्त्यासाठी 95 लाखांचा निधी; पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन संपन्न
– बाळासाहेब ठाकरे यांचा 11वा स्मृतीदिन : शिवसेनाप्रमुखांच्या आयुष्यातील हे महत्वाचे टप्पे माहितीयेत का? नक्की वाचा