पुणे जिल्हा ( Pune District ) वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने वडगाव मावळ मध्ये ( Vadgaon Maval ) युथ, ज्युनिअर आणि सिनियर गटाच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा ( Weightlifting Competition ) घेण्यात आल्या. तसेच राज्य स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा घेण्यात आल्या. दिनांक 5 नोव्हेंबर आणि दिनांक 6 नोव्हेंबर अशा दोन दिवस या स्पर्धा पार पडल्या.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) आणि सुनिल गणेशआप्पा ढोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सुनिलभाऊ ढोरे युवामंच आणि सह्याद्री जिमखाना यांच्यावतीने स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. यावेळी स्पर्धेला स्वतः आमदार सुनिल शेळके यांनी रविवारी (6 नोव्हेंबर) रोजी उपस्थित राहून विजेत्या स्पर्धकांना शुभेच्छा दिल्या. वडगावचे ग्रामदैवत श्री पोटोबा महाराज मंदिर प्रांगणात हि स्पर्धा आणि निवड चाचणी पार पडली. ( Weightlifting Competition At Vadgaon Maval On Occasion Of MLA Sunil Shelke Birthday )
हेही वाचा – Video : वडगाव मावळमध्ये जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा, खेळाडूंचा उत्स्फूर्त प्रतिसाद
पुणे जिल्हा वेटलिफ्टिंग संघटनेच्या मान्यतेने माजी नगरसेवक श्री.सुनिलभाऊ गणेशआप्पा ढोरे व माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून वडगाव मावळ येथे 'युथ ज्युनिअर व सीनियर गटाच्या जिल्हास्तरीय वेटलिफ्टिंग स्पर्धा' व राज्य स्पर्धेसाठी निवड चाचणी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. pic.twitter.com/2FqYelR7pM
— Sunil Shelke (@shelkesunilanna) November 6, 2022
“वेटलिफ्टिंग क्षेत्रात आपल्या मावळ तालुक्याचे नाव जागतिक स्तरावरील स्पर्धेमध्ये खेळाडूंनी सुवर्णाक्षरात नोंदवून गौरवास्पद कामगिरी केली आहे. खेळाडूंना प्रोत्साहन मिळण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन आवश्यक आहे. आगामी स्पर्धेत तालुक्यातील उदयोन्मुख खेळाडु उत्तम कामगिरी करून मावळचे नाव नक्कीच उज्वल करतील, याचा मला पुर्ण विश्वास आहे. स्पर्धेचे आयोजक व सर्व सहभागी खेळाडू यांचे आभार व्यक्त करतो,” असे सुनिल शेळके यांनी यावेळी म्हटले. यावेळी अनेक मान्यवरांसह विविध संघटनांचे पदाधिकारी, प्रशिक्षक, खेळाडू उपस्थित होते.
अधिक वाचा –
– पीएमपीकडून पीएमआरडीए क्षेत्रातील सुमारे 40 मार्ग बंद केले जाणार, लोणावळा मार्गाचाही समावेश, स्थानिकांचा विरोध
– मावळ तालुक्यातील अवैध दारूधंद्यावर कारवाईचा बडगा सुरुच, पोलिसांची अनेक ठिकाणी छापेमारी