सध्याचे वाढते तापमान पाहता आवश्यकता नसल्यास दुपारच्या वेळेत बाहेर पडणे, उन्हात फिरणे टाळावे असा सल्ला डॉक्टर देत आहेत. अशा वातावरणात उष्माघात होऊ शकतो, म्हणून काळजी घ्यावी असे सांगितले जाते. परंतू, उष्माघात म्हणजे नक्की काय? उष्माघातापासून बचाव कसा करावा? लहान मुले आणि प्रौढ व्यक्तींमध्ये उष्माघाताची लक्षणे कोणतही असतात? उष्माघातामुळे कुणाला त्रास होत असल्यास काय करावे? उन्हाळ्यात आहार कसा असावा? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण या लेखातून जाणून घेणार आहोत. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
उष्माघात –
“कडाक्याच्या उन्हात काम केल्याने किंवा शरीरात उष्णता निर्माण झाल्याने त्रास होऊ लागल्यास त्यातील गंभीर प्रकार म्हणजे उष्माघात किंवा ज्याला सनस्ट्रोक किंवा हिटस्ट्रोक.” उष्माघात ही शरीराची एक जीवघेणी अवस्था असल्याचे तज्ज्ञ सांगतात. महाराष्ट्रात विशेषत: नागपूर, मराठवाडा या भागात उष्माघातामुळे दरवर्षी मृत्यूच्या घटना घडतात. राजस्थान, दिल्ली, मध्य प्रदेश अशा अन्य काही उष्ण राज्यांमध्येही उष्णतेच्या तीव्र लाटांची झळ नागरिकांना सोसावी लागते. ( What is heatstroke Understand the causes and symptoms treatment first aid of heat stroke )
प्रौढ आणि लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे –
प्रौढांमध्ये उष्माघाताची लक्षणे :
– शरीराचे तापमान 104 फॅरन्हाईटपर्यंत (40 डिग्री सेल्सिअस) पोहोचल्यास,
– स्नायूंचे आखडणे,
– मळमळणे, उलटीचा भास होणे,
– चिंता वाटणे आणि चक्कर येणे,
– हृदयाचे ठोके वाढणे, धडधडणे
– लहान मुलांमध्ये उष्माघाताची लक्षणे :
– आहार घेण्यास नकार, चिडचिड होणे,
– लघवीचे कमी झालेले प्रमाण,
– शुष्क डोळे,
– कुठूनही रक्तस्त्राव होणे,
– तोंडाच्या येथील त्वचा कोरडी होणे.
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीला अशी करा मदत –
उष्णतेचा त्रास झालेल्या व्यक्तीची मदत करताना पुढील गोष्टींचा अवलंब करावा :
– संबंधित व्यक्तीला थंड ठिकाणी तातडीने हलवावे,
– शरीराच्या जास्तीत जास्त भागावर किंवा कपड्यावर छंड पाण्याचा मारा करावा,
– शक्य असेल तेवढा वेळ त्या व्यक्तीला वारा घालावा.
“शरीराचे तापमान वाढलेले, बेशुद्ध, गंधळलेली, घाम येणे थांबलेली अशी व्यक्ती आपल्या नजरेस आल्यास त्वरित 108/102 या क्रमांकावर संपर्क करावा.”
उष्णतेच्या लाटेदरम्यान खाणं-पिणं आणि रहाणीमान कसे असावे?
– हलके अन्न खावे,
– फळे आणि सलाड सारखे पचायला हलके अन्न खावे,
– पुरेसे पाणी प्या,
– सैल, हलके, फिक्या रंगाचे आणि सुती कपडे परिधान करावेत,
– गॉगल/ छत्री/ टोपी/ बुट/ घालूनच घराबाहेर पडावे,
– प्रवास करताना पाण्याची बाटली आपल्या जवळ बाळगावी,
– थंड पाण्याने अंघोळ करावी,
– घराबाहेर उपक्रम / मैदानी उपक्रमादरम्यान थोड्या थोड्या वेळाने विश्रांती घ्यावी.
अधिक वाचा –
– वडगावात मनसेकडून खळ्ळं खट्याक! ग्रामदैवताच्या मंदिराजवळील अवैध ताडी केंद्रावर चालवला बुलडोझर – पाहा व्हिडिओ
– पुणे जिल्हा : आंतरराज्यीय अमली पदार्थाच्या रॅकेटचा पर्दाफाश, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो पथकाची कारवाई । Pune News
– धक्कादायक! तळेगाव येथे सार्वजनिक शौचालयात आढळले एक दिवसाचे अर्भक । Talegaon Dabhade