नोव्हेंबर 2016 मध्ये भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घोषित करून कोट्यवधी भारतीय नागरिकांना एक मोठा धक्का दिला होता. त्यानंतर आता शुक्रवारी (दिनांक 19 मे) असाच काहीसा निर्णय रिझर्व बँक ऑफ इंडियाकडून ( Reserve Bank of India ) जाहीर करण्यात आलेला आहे. या निर्णयाद्वारे सध्या चलनामध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या सगळ्या नोटा बाद करण्यात आल्या आहेत.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
मागील काही महिने किंवा जवळपास वर्षभरापासून दररोजच्या व्यवहारातून दोन हजारांच्या नोटांचे प्रमाण कमी झाल्याचे बोलले जात होते. याशिवाय दोन हजारांच्या नोटांची नव्याने छपाई करणे देखील बंद झाले होते. मग या दोन हजारांच्या कमी होणाऱ्या नोटा गेल्या कुठं? असे प्रश्न बऱ्याचदा विचारले देखील गेले आणि आता याच दोन हजारांच्या नोटा चलनातून संपूर्णपणे बाद करण्याचे रिझर्व बँक ऑफ इंडियाने ठरवले आहे. ( What to do with 2000 rupee notes How to exchange it read in details )
रिझर्व बँक ऑफ इंडियाच्या निर्णयानुसार 23 मे 2023 पासून दोन हजार रुपयांच्या सगळ्या नोटा चलनातून बाद केल्या जातील. ज्या नागरिकांकडे दोन हजार रुपयांच्या नोटा आहेत ते नागरिक आपल्या बँक अकाउंट मध्ये हे पैसे सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत भरू शकतात. रिझर्व बँकेची नऊ विभागीय कार्यालये आणि इतर सगळ्या बँका 23 मे पासून दोन हजारांच्या नोटांच्या बदल्यात पाचशे रुपयांच्या किंवा शंभर आणि दोनशे रुपयांच्या नोटा नागरिकांना देण्यास सुरुवात करतील. दोन हजारांपेक्षा कमी रकमेच्या सगळ्या नोटा चलनामध्ये कायम राहतील असे देखील रिझर्व बँकेने सांगितलेले आहे.
नोव्हेंबर 2016 मध्ये जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 500 आणि हजारांच्या नोटा रात्रीतून बाद केल्या होत्या त्यावेळी दोन हजार रुपयांच्या नोटांच्या छापायला सुरुवात करण्यात आली होती. मात्र काही काळानंतर शंभर, दोनशे आणि पाचशे रुपयांच्या नव्या नोटा मुबलक प्रमाणामध्ये उपलब्ध झाल्या आणि त्यामुळेच दोन हजार रुपयांच्या नोटांची नव्याने छपाई करणे आरबीआयने 2018-19 मध्ये पूर्णपणे थांबवले.
तुमच्याकडे जर दोन हजार रुपयांच्या नोटा असतील तर तुम्ही काय करू शकता? ( What to do with 2000 rupee notes )
या नोटा बँकेमध्ये भरून त्या बदल्यात बँकेकडून शंभर दोनशे किंवा पाचशे रुपयांच्या नोटांच्या स्वरूपामध्ये पैसे घेऊ शकता. मात्र एकावेळी तुम्ही दोन हजार रुपयांच्या फक्त दहा नोटा म्हणजेच वीस हजार रुपये बँकेमध्ये भरू शकता, असे देखील आरबीआय ने आपल्या निर्णयांमध्ये स्पष्ट केलेले आहे. या सगळ्याची मुदत सप्टेंबर महिन्याच्या 30 तारखेपर्यंत आहे हे पुन्हा एकदा लक्षात घ्या. ही मुदत रिझर्व बँकेकडून वाढवण्यात येईल का? याबाबत आत्ता सध्या तरी काहीही सांगता येत नाही.
तुमच्याकडे जर दोन हजार रुपयांच्या जास्त नोटा असतील तर? तर तुम्ही ते सगळे पैसे एकाच वेळी तुमच्या अकाउंट मध्ये भरू शकता आणि त्याच्या अगेन्स्ट बँकेतून पैसे काढू देखील शकता. जर तुम्हाला दोन हजारांच्या नोटा भरून लगेच त्या बदल्यात पैसे हवे असतील तर त्याचे लिमिट एकावेळी दहा नोटा असे ठेवण्यात आलेले आहे.
रिझर्व बँकेच्या म्हणण्यानुसार सध्या चलनामध्ये असलेल्या दोन हजार रुपयांच्या एकूण नोटांपैकी जवळपास 89 टक्के नोटांची छपाई मार्च 2017 च्या अगोदर झाली होती. या नोटा आता जवळपास चार ते पाच वर्षे जुन्या झाल्या आहेत आणि त्यांचे आयुष्य संपले आहे. तीस मार्च 2018 रोजी चलनात असणाऱ्या दोन हजार रुपयांच्या एकूण नोटांची किंमत जवळपास 6.73 लाख कोटी रुपये एवढी होती. हाच आकडा 31 मार्च 2023 अखेरीस 3.62 लाख कोटी रुपयांपर्यंत खाली आलेला आहे.
रिझर्व्ह बँकेच्या क्लीन नोट पॉलिसी नुसार नागरिकांना चांगल्या स्थितीतील नोटा उपलब्ध व्हाव्यात म्हणून हा निर्णय घेण्यात आल्याचे देखील सांगण्यात येत आहे. अर्थात या सगळ्याचा सामान्य नागरिकांवर थोडा तरी परिणाम होणारच.
अधिक वाचा –
– प्रेरणादायी..! मावळातील या बहीण-भावाची जिल्ह्यात होतेय चर्चा, एकाचवेळी पोलीस दलात निवड, नक्की वाचा
– अखेर न्याय मिळालाच..! पवना धरणग्रस्तांसाठी आनंदाची बातमी, बाधित शेतकर्यांना प्रत्येकी चार एकर जमीन मिळणार