Dainik Maval News : वडगाव शहरातील सर्व प्रभागांमध्ये प्रत्यक्ष भेट देऊन नागरिकांशी थेट संवाद साधत आमदार सुनील शेळके यांनी अवैधरित्या सुरु असलेल्या मटका आणि दारूच्या अड्डयावरही बेधडक छापा टाकून पोलिसांमार्फत कारवाई केली. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी डॉ.प्रवीण निकम, माजी उपसभापती गणेश ढोरे यांसह सर्व प्रशासकीय अधिकारी, कर्मचारी, कार्यकर्ते दौऱ्यात सहभागी होते.
शुक्रवारी (दि.२४) आमदार शेळके यांनी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून वडगाव शहरातील विशाल लॉन्स, मोरया कॉलनी, साई श्रुष्टी, पंचमुखी चौक, केशवनगर, मोरया चौक, बाजार पेठ, आंबेडकर कॉलनी, माळीनगर, दिग्विजय कॉलनी, संस्कृती सोसायटी, टेल्को कॉलनी, इंद्रायणीनगर, मिलिंदनगर, कातवी गाव या भागात प्रत्यक्ष भेट देऊन विकासकामांच्या आढाव्यासह नागरिकांशी संवाद साधत त्यांच्या समस्या समजून घेतल्या.
- आमदार शेळके यांनी दौऱ्यात नागरिकांकडून उपलब्ध होणाऱ्या रस्ते, गटार, विद्युत, पाणी, कचरा आदी समस्या, तक्रारी याबाबत नगरपंचायत प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन कार्यवाही करावी, अशी सूचना केली. तसेच वडगाव शहरातील मोकळ्या जागांचे सर्वेक्षण करून तिथे विकासात्मक कोणते प्रकल्प राबविता येईल, याबाबत अहवाल तयार करण्याच्या सूचना दिल्या.
वडगाव शहरातील वाढती गुन्हेगारी व तरुणांमध्ये वाढणाऱ्या व्यसनांच्या प्रमाणाला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनास सूचना दिल्या असुन नागरिकांनी देखील जागरूक राहण्याबाबत आमदार शेळके यांनी विनंती केली. यावेळी आमदारांसोबत संवाद साधण्यासाठी महिलांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. दरम्यान प्रत्येक व्यक्तीची तक्रार जाणून घेऊन जागेवरच त्याचे निरसन करत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले.
मटका व दारू अड्डयावर छापा –
केशवनगर भागात दौरा सुरू असताना नागरिकांनी रेल्वे लाईनच्या बाजूला मटका अड्डा सुरू असल्याने खूप त्रास होत असल्याच्या तक्रारी आमदार शेळके यांच्याकडे मांडल्या. त्यामुळे आमदार शेळके यांनी थेट ताफ्यासह मटका अड्ड्यावर जाऊन मटका अड्डा चालविणाऱ्या व्यक्तिला पोलिसांसमोर रंगेहाथ पकडुन पोलिसांच्या स्वाधीन केले. यानंतर प्रभाग चार मध्ये सुरू असलेल्या दारूच्या अड्डयावरही त्यांनी छापा टाकला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– केंद्र सरकारकडून पद्म पुरस्कारांची घोषणा ! महाराष्ट्रातील चौदा जणांचा समावेश ; मनोहर जोशी यांना मरणोत्तर पद्मभूषण, अशोक सराफ यांना पद्मश्री
– महाराष्ट्रातील 48 पोलिसांना उत्कृष्ट सेवेकरिता ‘पोलीस पदके’ तर चार अधिकाऱ्यांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक – पाहा यादी
– महाराष्ट्रातील तिघांना ‘जीवन रक्षा पदक’ पुरस्कार जाहीर, देशात एकूण 49 व्यक्तींना मिळणार पुरस्कार – पाहा यादी