Dainik Maval News : मुलगी झाल्याच्या रागातून पत्नीला मारहाण करत तिचा गळा दाबून खून करणाऱ्या नराधम पतीला वडगाव मावळ सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी. के. अनभुले यांनी हा निकाल दिला.
योगेश कैलास जाधव (वय ३३, रा. चंदनवाडी, चांदखेड, मावळ) असे शिक्षा सुनावलेल्या पतीचे नाव आहे. याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल होता. चांगुणा योगेश जाधव यांचा खून झाला होता. याबाबत चांगुणा यांचे वडील शिवाजी दामू ठाकूर (वय ४५, रा. परंदवाडी, मावळ) यांनी तक्रार दिली होती.
योगेश हा पत्नी चांगुणा यांच्याशी मुलगी झाली म्हणून नेहमी वाद घालत होता. त्यांना मारहाण करत होता. २८ ऑगस्ट २०२१ ला अशाच वादामध्ये त्याने पत्नीचा गळा दाबून खून केला होता. या खटल्याचे कामकाज सरकारतर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता म्हणून स्मिता मुकुंद चौगुले यांनी पाहिले. ॲड. चौगुले यांनी या खटल्यामध्ये परिस्थितीजन्य व वैद्यकीय पुरावे अन्वये आठ साक्षीदारांची साक्ष घेऊन योग्य पुरावे सादर केले. तसेच गुन्हा खटला शाबीत करण्यासाठी प्रभावीपणे युक्तिवाद केला.
युक्तिवादात त्यांनी सर्वोच्च व उच्च न्यायालयाचे न्यायनिवाडे सादर केले. सरकार पक्षाचे साक्षी पुरावे व युक्तिवाद ग्राह्य धरून योगेश याला न्यायालयाने सश्रम जन्मठेप आणि १५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक कन्हैयालाल थोरात आणि शिरगाव परंदवाडी पोलीस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विशाल पाटील, तत्कालीन तपास अधिकारी उपनिरीक्षक संदीप गाडिलकर यांच्या मार्गदर्शनानुसार कोर्ट पोलीस अंमलदार अविनाश हरी गोरे व पोलीस शिपाई शिल्पा माळी यांनी सदर खटल्यामध्ये न्यायालयामध्ये पाठपुरावा केला.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात ग्लास स्काय वॉक प्रकल्पाबाबत विशेष बैठक संपन्न । Lonavala Glass Sky Walk
– अल्पवयीन मुली, महिलांचे अपहरण करून त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करणारा सराईत गुन्हेगार जेरबंद ; पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कामगिरी
– उर्से खिंडीत गणेशमूर्ती आढळल्याने खळबळ; संकलित केलेल्या मूर्तींचे योग्य प्रकारे विसर्जन न केल्याने नागरिकांचा संताप । Maval News
– अजित पवार यांच्या सूचनेनंतर चाकणमधील अतिक्रमणविरोधी कारवाईला वेग ; पीएमआरडीएकडून कारवाई सुरू । Chakan News

