पवनानगर जवळील करुंज या गावात रविवारी (8 जानेवारी) सायंकाळच्या सुमारास एक लांडोर जखमी अवस्थेत असल्याचे स्थानिकाला दिसून आले. गावातील ग्रामस्थ गोरख शेंडगे यांनी हि माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेला फोनद्वारे कळवली. त्यानंतर वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी तत्काळ घटनास्थळी जात लांडोरला सुरक्षितरित्या रेस्क्यू केले.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
संस्थेच्या सदस्यांनी पक्ष्याची तिथे पोहोचल्यावर तपासणी तेव्हा त्या लांडोरच्या पायाला खोलवर जखम झाल्याने दिसून आले. त्यामुळे तिला चालता येत नव्हते. गोरख शेंडगे यांनी घराजवळील ओढ्याजवळ लांडोरला जखमी अवस्थेत पाहिल्यावर तिला मोकळ्या पोल्ट्रीत आणून ठेवले होते. वन्यजीव रक्षक मावळच्या सदस्यांनी लांडोरला व्यवस्थित हाताळून वनविभागास हि माहिती कळवली आणि पक्ष्याला पुढील उपचारासाठी पुणे येथील रेस्क्यू सेंटरला पाठवले.
सदर रेस्क्यू ऑपरेशनकरिता वन्यजीव रक्षक मावळ संस्थेच्या सदस्यांनी सहाय्य केले. यात अनिल आंद्रे, गणेश निसाळ, सत्यम सावंत, गणेश ढोरे, जिगर सोलंकी, संतोष दहिभाते, शत्रुघ्न रासनकर, राजेंद्र सातपुते, गोरख शेंडगे, शब्बीर शेख या सर्वांची विशेष मदत झाली. वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे अध्यक्ष अनिल आंद्रे आणि गणेश निसाळ (अध्यक्ष, आपत्ती व्यवस्थापन सर्च अँड रेस्क्यू टीम वन्यजीव रक्षक मावळ संस्था) यांनी हि माहिती दिली.
अधिक वाचा –
– मोठी बातमी! पवना डॅममध्ये बुडून शिक्षकाचा मृत्यू
– मावळ तालुक्यात 4 कोटी 46 लाखांच्या पाणी पुरवठा योजनांचे भूमीपूजन । Jal Jeevan Mission
– अपघात ब्रेकिंग । कामशेत ते मळवली रेल्वे स्टेशन दरम्यान मालगाडीच्या धडकेत अनोळखी वृद्धाचा मृत्यू