Dainik Maval News : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) अंतर्गत आयोजित हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्घाटन शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी मौजे आढे येथे उत्साहात संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभाला मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव प्रा. वसंत पवार, सरपंच सुनीता सुतार, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सोमनाथ सुतार, पोलीस पाटील सुभाष ठाकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, रोहिदास धामणकर, उर्मिला सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी प्रा. वसंत पवार यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना ही युवक-युवतींच्या चारित्र्य घडणीची पहिली पायरी असून, विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व नैतिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे प्रतिपादन केले.
अध्यक्षीय भाषणात यादवेंद्र खळदे यांनी शिबिरातील उपक्रम केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात ठोस व उपयुक्त काम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच स्वयंसेवकांनी शिबिरातून जाताना आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.
उद्घाटन समारंभाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. माधुरी चंदनशिव यांनी केले.
या प्रसंगी प्रा. श्रुतिका झोडगे, ग्रंथपाल प्रा. सुनिता पाटील, प्रा. विकास गवळी, लिपिक गौरव गायकवाड, सेवक अमित पवार, सुनील कारके तसेच रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
( दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


