व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Tuesday, August 4, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

आढे गावात सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिर

प्रा. वसंत पवार यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना ही युवक-युवतींच्या चारित्र्य घडणीची पहिली पायरी असून शिबिराच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व नैतिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे प्रतिपादन केले.

Vishal Kumbhar by Vishal Kumbhar
December 28, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Winter special camp under NSS of Savitribai Phule Mahila Mahavidyalaya in Aadhe village

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना (रासेयो) अंतर्गत आयोजित हिवाळी विशेष श्रमसंस्कार शिबिराचे उद्‌घाटन शनिवार, दि. २७ डिसेंबर २०२५ रोजी मौजे आढे येथे उत्साहात संपन्न झाले.

या उद्‌घाटन समारंभाला मावळ शिक्षण प्रतिष्ठानचे सचिव यादवेंद्र खळदे, सहसचिव प्रा. वसंत पवार, सरपंच सुनीता सुतार, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष सोमनाथ सुतार, पोलीस पाटील सुभाष ठाकर, माजी मुख्याध्यापक प्रकाश शिंदे, रोहिदास धामणकर, उर्मिला सुतार आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी प्रा. वसंत पवार यांनी आपल्या मनोगतात राष्ट्रीय सेवा योजना ही युवक-युवतींच्या चारित्र्य घडणीची पहिली पायरी असून, विशेष श्रमसंस्कार शिबिराच्या माध्यमातून सामाजिक, राजकीय व नैतिक मूल्यांची रुजवणूक होत असल्याचे प्रतिपादन केले.

अध्यक्षीय भाषणात यादवेंद्र खळदे यांनी शिबिरातील उपक्रम केवळ फोटो काढण्यापुरते मर्यादित न ठेवता प्रत्यक्षात ठोस व उपयुक्त काम होणे आवश्यक असल्याचे सांगितले. तसेच स्वयंसेवकांनी शिबिरातून जाताना आपल्या जीवनात आमूलाग्र बदल घडवून आणावा, असे आवाहन त्यांनी केले.

उद्‌घाटन समारंभाचे प्रास्ताविक रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. हेमंत मुजळगेकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कसबे यांनी केले, तर आभार प्रदर्शन महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्य डॉ. माधुरी चंदनशिव यांनी केले.

या प्रसंगी प्रा. श्रुतिका झोडगे, ग्रंथपाल प्रा. सुनिता पाटील, प्रा. विकास गवळी, लिपिक गौरव गायकवाड, सेवक अमित पवार, सुनील कारके तसेच रासेयो स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

( दैनिक मावळचा व्हॉट्सअ‍ॅप चॅनेल जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा )
अधिक वाचा –
– मंगरूळ अवैध उत्खनन प्रकरण : निलंबित महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन रद्द, दहाही अधिकाऱ्यांना मोठा दिलासा
– तळेगावमधील सर्व सोसायट्यांना 31 डिसेंबरपर्यंत नळजोडणीस वॉटर मीटर बसविण्याची सक्ती ; वॉटर मीटरला विरोध केल्यास नळजोड खंडीत होणार
– श्री लोहगड ते श्री भिवगड : मावळ तालुक्यात तब्बल 23 वर्षांनंतर धारातीर्थ गडकोट मोहीम – जाणून घ्या मोहिमेबद्दल
– धक्कादायक ! खोपोलीत नवनिर्वाचित नगरसेविकेच्या पतीला संपवलं ; रस्त्यात गाडी अडवून केला प्राणघातक हल्ला


dainik maval jahirat

Previous Post

तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षांचा सोमवारी पदभार स्वीकार समारंभ ; ‘या’ मान्यवरांची असणार उपस्थिती

Next Post

सोमाटणे टोलनाका येथे पोलीस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघड

Vishal Kumbhar

Vishal Kumbhar

पत्रकारिता क्षेत्रात मागील 8 वर्षांपासून कार्यरत. जर्नालिझम आणि मास कम्युनिकेशनचे शिक्षण. राज्यशास्त्र विषयात पदव्युत्तर पदवी आणि प्राध्यापक म्हणून कार्य. राजकारण, आंतरराष्ट्रीय घडामोडी, पंचायतराज, समाजशास्त्र, अर्थशास्त्र, क्रीडा आणि मनोरंजन क्षेत्रातील घडामोडींचे विशेष ज्ञान. काही प्रसिद्ध माध्यमांमध्ये कंटेंट कन्सल्टंट म्हणून नियुक्त. ईटीव्ही भारत, डेलीहंट, महा स्पोर्ट्स, दैनिक बोंबाबोंब, पैसापाणी, लोकल अ‍ॅप, थोडक्यात, जळगाव लाईव्ह अशा प्रसिद्ध माध्यमांसोबत कामाचा दीर्घ अनुभव.

Next Post
Crime

सोमाटणे टोलनाका येथे पोलीस पथकावर गोळीबाराचा प्रयत्न करणाऱ्या सराईत गुन्हेगारांकडून घरफोडीचे बारा गुन्हे उघड

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Marathi Journalist Sangh Maval Taluka New Executive Committee announced

मराठी पत्रकार संघ मावळ तालुका नूतन कार्यकारिणी जाहीर; अध्यक्षपदी वाडेकर, कार्याध्यक्षपदी पवार, सचिवपदी विनोदे – पाहा संपूर्ण कार्यकारिणी

August 4, 2026
MLA Sunil Shelke efforts land transferred to talegaon nagarparishad for Andhra Dam water project

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश ; आंध्रा धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

August 4, 2026
ISO Rating of Zilla Parishad Schools in Mundhavare Valak Wadiwale village in maval taluka

मुंढावरे, वळक, वाडीवळे येथील जिल्हा परिषद शाळांना आयएसओ मानांकन

August 4, 2026
Cyber ​​security and anti-drug awareness campaign by Vadgaon Maval Police

Vadgaon Maval : वडगाव मावळ पोलिसांकडून सायबर सुरक्षा आणि अंमली पदार्थविरोधी जनजागृती

August 4, 2026
Alert issued for various districts in state heavy rain accompanied by lightning forecast for next five days

राज्यातील विविध जिल्ह्यांना अलर्ट जारी ; पुढील पाच दिवसांसाठी विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज

August 2, 2026
Live 7-12 extracts distributed to farmers in Maval citizens benefited from Shivaji Maharaj Maharajswa Camp

मावळातील ३३७१ खातेदारांना जिवंत सातबारा वाटप ; छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचा ३३२९ नागरिकांनी घेतला लाभ

August 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.