Dainik Maval News : तळेगाव दाभाडे शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या घराबाहेर एका गाडीवर लिंबू, हळदी-कुंकू ठेवून जादूटोण्याचा प्रकार केल्याप्रकरणी एका महिलेविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना २९ जुलै २०२५ रोजी रात्री १० ते १०.३० दरम्यान घडली. सुहास बळीराम गरुड (वय ४९, रा. शनिवार पेठ, तळेगाव दाभाडे) यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे.
फिर्यादी यांच्या मालकीच्या एमएच १४ जीवाय ३६२३ क्रमांकाच्या मास्ती एस-क्रॉस गाडीवर महिला आरोपीने पार्किंगच्या जागी येऊन एका कागदावर लिंबू ठेवून त्यावर हळदी-कुंकू टाकले. त्यामुळे फिर्यादीने जादूटोण्याचा संशय व्यक्त केला.
या घटनेनंतर महिला आरोपी (रा. तळेगाव दाभाडे) हिच्याविरुद्ध महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध अधिनियम २०१३ च्या कलम ३(२) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणाचा तपास मपोउपनि गावडे करत असून, आरोपीला अद्याप अटक करण्यात आलेली नाही.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत वडगाव मावळ येथे घरकुल आदेश आणि चावी वाटपाचा भव्य सोहळा संपन्न । Maval News
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचा पिंपरी महापालिकेत समावेश करण्याची मागणी ; खासदार बारणे यांनी घेतली संरक्षण मंत्र्यांची भेट
– पुणे शहरासह जिल्ह्यातील वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पुणे ते अहिल्यानगर आणि तळेगाव-चाकण-उरुळी हे दोन रेल्वेमार्ग अस्तित्वात येणार
– श्रावण मास । नागपंचमी विशेष : श्रावणातील नाग-नरसोबाचा कागद म्हणजे प्राचीन मातृका पुजनाचे आधुनिक रुप