Dainik Maval News : सोमाटणे फाटा येथील एका हॉटेलमध्ये महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करवून घेतला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी हॉटेलवर कारवाई करीत दोन महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
- ही कारवाई शनिवारी (दि. 19 एप्रिल) रात्री करण्यात आली. सोमाटणे फाटा येथील कॅसोनोवा या हॉटेलमध्ये वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती तळेगाव दाभाडे पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी हॉटेलवर छापा मारला.
सदर कारवाईमध्ये आरोपी महिला ही दोन महिलांना पैशांचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्या व्यवसाय करून घेत असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी संबंधित महिलेला अटक केली असून दोन पीडित महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका केली आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– मोठी बातमी ! तळेगाव ते चाकण चार पदरी उन्नत मार्ग आणि समांतर चार पदरी रस्त्याला मंत्रिमंडळाची मंजुरी
– फसवणुकीला माफी नाही..! बनावट पनीर विक्रेत्यांवर आता एफडीएची नजर ; ग्राहकांची फसवणूक करणाऱ्यांचे परवाने रद्द होणार
– चांगला निर्णय ! अपघातग्रस्त रुग्णांसाठी एक लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस उपचार