वडगाव शहरातील मोरया महिला प्रतिष्ठानच्या महिलांनी बुधवारी महिला दिनाच्या दिवशीच शहरातील एक अवैध दारुचा कारखाना जमीनदोस्त ( Illegal Liquor Factory Destroyed ) केला आहे.
वडगाव शहरातील मोरया महिला प्रतिष्ठान च्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली अगोदर श्रीमंत सरदार महादजी शिंदे यांच्या स्मारकास अभिषेक आणि पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रतिष्ठानच्या बहुसंख्य सदस्य महिलांनी वडगाव शहरातील रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यालगत असलेल्या मयुरेश्वर कॉलनी परिसरातील बेकायदेशीर गावठी हातभट्टी दारूच्या अड्डयाची तोडफोड करत निषेध व्यक्त केला. ( Women Of Moraya Mahila Pratishthan From Vadgaon Maval Destroyed Illegal Liquor Factory In City )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
विशेष म्हणजे हा दारू विक्रीचा व्यवसाय महिलाच करत होत्या. सदरचे बेकायदेशीर असलेले दारू विक्रीचे ठिकाण भर वस्तीतील आठवडे बाजार आणि रेल्वे स्टेशन कडे जाणाऱ्या रोड लगत असल्याने या भागातील रहिवाशांना आणि या रस्त्याने ये जा करणाऱ्या नागरिकांना तसेच या भागातील रस्त्यावर लहान मुली, तरुण मुली आणि महिला प्रचंड मानसिक तणाव सहन करावा लागत असे, असे आंदोलक महिलांनी सांगितले. तसेच या भागात दारू पिणाऱ्या व्यक्तींमुळे महिला वर्गाला छेडछाडीचे प्रकाराला सामोरे जावे लागत असल्याने या नाहक त्रासाचा सामना महिला भगिनींना करावा लागतो. त्यामुळेच मोरया प्रतिष्ठानने वेळोवेळी आंदोलने केली होती, तसेच पोलीस स्टेशनला निवेदने दिली होती. मात्र, याा काहीही उपयोग न झाल्याने हे पाऊल उचलल्याचे आंदोलक महिलांनी सांगितले.
स्थानिक पोलीस प्रशासनाकडून तात्पुरती कारवाई झाल्यानंतर हा व्यवसाय लगेचच दुसऱ्या दिवशी राजरोसपणे चालू होत असे. अखेर महिला दिनाचेच औचित्य साधत मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या मार्गदर्शनाखाली नगरसेविका पुनम जाधव, चेतना ढोरे, कविता नखाते, प्रतिक्षा गट, जयश्री जेरटागी, मीनाक्षी ढोरे, सुषमा जाजू, शितल ढोरे, सोनाली मोरे, विजया माळी, अमृता कांबळे आदींसह प्रतिष्ठानच्या संचलिका आणि सदस्या मोठ्या संख्येने सहभागी होत, हा दारू अड्डा उध्वस्त करून समक्ष आढळलेल्या मालाची होळी करण्यात आली.
हेही वाचा – वडगाव शहरात महिला भगिनींसाठी वर्षभराकरिता कायमस्वरूपी घरगुती स्वयंरोजगाराचा शुभारंभ
हा बेकायदेशीर सुरू असलेला दारू व्यवसाय या भागातून कायमचा बंद करावा, यासाठी आमच्या मोरया महिला प्रतिष्ठानच्या वतीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक तसेच वडगाव मावळ पोलिस स्टेशन यांना निवेदन देण्यात आले आहे. तसेच येणाऱ्या कालावधीत पोलीस विभाग योग्य ती कारवाई करील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.
अधिक वाचा –
– धक्कादायक! मुळशी तालुक्यातील नामांकीत पैलवानाचा तालमीत सराव करत असताना हार्ट अटॅकने मृत्यू
– तळेगाव-चाकण मार्गावर ट्रक चालकाला मारहाण आणि लुटमार, तळेगाव दाभाडे पोलिसांत गुन्हा दाखल