मावळ तालुक्यातील दुर्गम भागातील जिल्हा परिषद शाळा मोरवे येथे कार्यानुभव कार्यशाळा मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आली होती. मावळचे टोक असलेल्या या शाळेत विविध उपक्रम राबवले जातात. याचाच एक भाग म्हणून कार्यानुभव कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. ( Work Experience Workshop at Zilla Parishad School Morave Village Maval Taluka )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
सदर कार्यशाळेला मार्गदर्शक म्हणून संजयकुमार राजस्थानी उपस्थित होते. संजयकुमार यांनी कागदापासून विविध कलाकृती सादर केल्या. विद्यार्थ्यांना कागदी फुलं, गुच्छ, बाहुल्या, तोरणं, ध्वज काठी, विविध खेळण्या इत्यादी विषयांवर मार्गदर्शन करुन प्रत्यक्षात वस्तू बनवून दाखवल्या. विद्यार्थ्यांनी कमी वेळात कार्यानुभव कार्यशाळेचा अनुभव घेतला.
शाळेच्या वतीने संजयकुमारचा उचित सन्मान करण्यात आला. तर यावेळी शिक्षक शरद शिंदे, तनिष्का प्रेरणा प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अन्नपूर्णा पाखरे, अंगणवाडी सेविका सुनंदा घारे आणि मुख्याध्यापक सर्जेराव पाखरे हे उपस्थित होते. ( Work Experience Workshop at Zilla Parishad School Morave Village Maval Taluka )
अधिक वाचा –
– प्रवाशांनो, काळजी घ्या! मृत्यू असाही येऊ शकतो… मंगलकार्याला निघाला पण त्याचाच अंत्यविधी झाला !
– नातलग चिमुरडीवर बला’त्कार करणाऱ्या नराधमाला वडगाव मावळ पोलिसांकडून अटक; 13 डिसेंबरपर्यंत कोठडी