लोकसभा निवडणूक आचारसंहितेमुळे रखडलेल्या लोणावळा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाच्या कामाला नगर परिषदेकडून अखेर सुरूवात करण्यात आली आहे. सुमारे साडेतीन कोटी रूपये खर्चून हे स्मारक तयार करण्यात येणार आहे. वर्षभरात हे काम पूर्ण करण्याचे नियोजन लोणावळा नगर परिषदेकडून करण्यात आले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्र सुवर्णजयंती नगरोत्थान अभियान, जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून उपलब्ध निधीतून लोणावळा शहरातील बाजारपेठ भागात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा आणि परिसराचे सुशोभीकरण करण्यात येत आहे. ( Work of Chhatrapati Shivaji Maharaj memorial in Lonavla has been started by Nagar Parishad )
गेली अनेक वर्षे पुतळ्याच्या सुशोभीकरणाचे काम रखडले होते. माजी नगरसेवक निखिल कवीश्वर यांनी यासाठी उपोषण केले होते. तर, रिपब्लिकन पक्षाने घंटानाद मोर्चा काढला होता. यासह छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम लवकर मार्गी लागावे, यासाठी लोकप्रतिनिधींसह हिंदू समिती, शिवसेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, कॉँग्रेस आजी राजकीय पक्षांनी वेळोवेळी निवेदने दिली होती.
त्यानंतर तीन महिन्यांपूर्वी स्मारकाच्या कामासाठी आवश्यक असणारा निधी आणि तांत्रिक मंजुरी मिळाली होती. मावळचे आमदार सुनिल शेळके, माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव, माजी उपनगराध्यक्ष श्रीधर पुजारी यांच्या पाठपुराव्यातून शिवजयंतीच्या दिवशी शहरातील सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते व शिवप्रेमींच्या उपस्थितीत स्मारकाच्या सुशोभीकरण कामाचे भूमिपूजन करण्यात आले होते.
अधिक वाचा –
– मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke
– वाढदिवसानिमित्त दिव्यांग विद्यार्थ्यांच्या शाळेत शालेय साहित्य आणि खाऊचे वाटप । Maval News
– ‘I Nilesh Lanke..’ कमालच झाली ! निलेश लंकेंनी थेट इंग्रजीत घेतली खासदारकीची शपथ, सुजय विखेंना कृतीतून प्रत्युत्तर – पाहा Video