व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Thursday, March 5, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

टाकवे बुद्रूक येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात, क्रांतिकारकांच्या स्मारकासाठी 1 कोटी निधी देण्याची आमदार शेळकेंची घोषणा

मावळ तालुक्यात आदिवासी विचारमंच मावळ, बिरसा ब्रिगेड मावळ, के. ए. ग्रुप मावळ आणि समस्त आदिवासी समाज यांच्यावतीने टाकवे बुद्रूक येथे मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
August 11, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
World Tribal Day

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : आधुनिक काळात जगभरातील आदिवासी संस्कृती आणि सभ्यता अधिक बळकट व्हावी, त्याचे योग्य जतन व्हावे यासाठी दरवर्षी 9 ऑगस्ट हा दिवस ‘जागतिक आदिवासी दिवस’ (जागतिक आदिवासी लोकांचा आंतरराष्ट्रीय दिवस) म्हणून साजरा केला जातो. मावळ तालुक्यात देखील यंदा आदिवासी विचारमंच मावळ, बिरसा ब्रिगेड मावळ, के. ए. ग्रुप मावळ आणि समस्त आदिवासी समाज यांच्यावतीने टाकवे बुद्रूक येथे मोठ्या उत्साहात जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

कार्यक्रमाची सुरूवात वडगाव मावळ येथे ग्रामदैवत पोटोबा महाराज मंदिरापासून झाली. शहरातून जंगी मिरवणूक काढण्याच आली. त्यानंतर वडगाव ते कान्हे ते टाकवे अशी भव्य बाइक रॅली काढण्यात आली. त्यानंतर कार्यक्रमस्थळी टाकवे येथे मुख्य कार्यक्रमाला सुरूवात झाली. आदिवासी क्रांतिकारक आणि कुलदैवत यांचे प्रतिमापूजन करून मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रम सुरू झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. अजय सुपे होते. प्रमुख वक्ते म्हणून प्रा. दत्तात्रय भांगे यांनी आदिवासी संस्कृती, आदिवासी समाजाची सध्यस्थीती आणि भविष्यातील आदिवासी तरुणांपुढील आव्हाने यावर विचार मांडले. प्रमुख अतिथी प्रा. रोशनी मराडे यांनी आदिवासी कवितांच्या माध्यमातून आदिवासी स्त्रियांचे जीवन आणि संघर्ष, यासह भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान यावर भाष्य केले.

कार्यक्रमात आदिवासी समाजातील इयत्ता दहावी आणि बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सोबतच सरकारी सेवेत नियुक्त झालेल्या युवकांना गौरविण्यात आले. तसेच कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल नाथा चिमटे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी सटवाईवाडी येथील आदिवासी मुलींनी तारपा नृत्यातून आदिवासी संस्कृतीचे दर्शन घडविले आणि सर्वांची मने जिंकली. ( World Tribal Day celebrated in the presence of MLA Sunil Shelke at Takwe Budruk )

  • याप्रसंगी मावळचे आमदार सुनिल शेळके यांची प्रमुख उपस्थिती होती. आमदार शेळके यांनी मनोगतादरम्यान, तालुक्यात आदिवासी समाजासाठी केलेल्या विविध कामांची माहिती दिली. सोबत आदिवासी समाजासाठी तालुक्याच्या ठिकाणी भव्य सांस्कृतिक भवन आणि आदिवासी क्रांतिकारकांचे स्मारक व्हावे यासाठी जागा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी एक कोटी रुपये निधी देणार असल्याचे आश्वास आमदार महोदयानी दिले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भिकाजी केंगले, चंद्रकांत तळपे यांनी केले. प्रास्ताविक महादेव विरनक सर यांनी मांडले. तर आभार बाजीराव सुपे यांनी मानले. कार्यक्रमाला काँग्रेसचे जेष्ठ नेते चंद्रकांत सातकर, आदिवासी समाजासाठी काम करणारे देवाभाऊ गायकवाड यांसह बिरसा ब्रिगेड मावळचे विक्रम सोरकादे, कैलास करवंदे, दत्ता चिमटे, किरण हेमाडे, काळुराम वाजे, लहू भालिंगे, सोपान गोंटे, रवी सुपे, करण काठे, उल्हास बगाड, सूर्यकांत तळपे, नाथा गोडे, ज्ञानेश्वर मोरमारे, रामदास काठे, बाळासाहेब बगाड, नागुजी ढोंगे यांनी उपस्थित होते.

अधिक वाचा –
– तळेगावात भाजपाची गांधीगिरी, रविंद्र भेगडे यांच्या नेतृत्वात विद्यार्थी आघाडीचे स्वखर्चाने बुजविले मुख्य मार्गावरील खड्डे
– राष्ट्रवादी काँग्रेसची जनसन्मान यात्रा शुक्रवारी मावळात येणार, अजित पवार साधणार लाडक्या बहिणींशी संवाद, वाचा अधिक
– मनोज जरांगेंची मराठा आरक्षण शांतता रॅली पुण्यात, ‘असा’ असेल मार्ग, पार्किंगसह चोख नियोजन, सभेला येणार लाखो मराठा बांधव


Previous Post

वडेश्वर येथील आश्रम शाळेत विविध कार्यक्रमांसह जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा । Maval News

Next Post

किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Online Gazette Application for Name Birth Date Change in Maharashtra

किती सोप्पं ! आता नाव, जन्मतारीख बदलण्यासाठी कुठे खेटे मारण्याची गरज नाही, घरबसल्या ऑनलाईन अर्ज करून मिळवा गॅझेट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Indian-Railway

पुणे – लोणावळा रेल्वे प्रवास होणार सुसाट.. प्रवाशांचा वेळ वाचणार ; रेल्वे विभागाचा मास्टर प्लॅन – वाचा सविस्तर

March 4, 2026
thrill of shivkalin sports in Vadgaon Maval on day of Dhulwad new record in stone-lifting competition

धुलिवंदनाच्या दिवशी वडगावमध्ये शिवकालीन मर्दानी खेळाचा थरार ; दगडीगोटी उचलण्याच्या स्पर्धेत ४०१ बैठकांचा नवा विक्रम

March 4, 2026
Crime

तळेगाव दाभाडे येथे अंमली पदार्थ प्रकरणी मोठी कारवाई ; ७ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन आरोपी अटकेत

March 4, 2026
BJP names Vinod Tawde Ramdas Athawale as Rajya Sabha candidates 4 vacant seats in Maharashtra

मोठी बातमी ! भाजपाकडून विनोद तावडे, रामदास आठवले यांना राज्यसभेची उमेदवारी ; महाराष्ट्रातील ४ रिक्त जागांसाठी उमेदवार जाहीर

March 4, 2026
Tukaram Maharaj Beej Sohla Dehu

संत तुकाराम महाराज बीज सोहळा : ४ ते ६ मार्चदरम्यान वाहतुकीत मोठे बदल, अनेक मार्ग बंद, पर्यायी रस्त्यांचा वापर करण्याचे आवाहन

March 4, 2026
Deputy Chief Minister Eknath Shinde reviewed work on missing link on Mumbai Pune Expressway

मोठी बातमी ! मुंबई-पुणे मिसिंग लिंकच्या पूर्णतेसाठी नवीन डेडलाईन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती, अधिवेशनात झाली चर्चा

March 2, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.