हौसेला मोल नसतं, प्रेमापुढे सर्वकाही शून्य असतं… अगदी याचीच प्रचिती मावळ तालुक्यात रविवार (19 मार्चला) आली. घरात जन्माला आलेल्या नव्या पिढीचे सर्वांनाच कौतूक असते, त्यासाठी अन्नदान वगैरे केल्याची उदाहरणे आपण पाहिली असतील. परंतू मावळ तालुक्यातील राऊतवाडी इथे (पो. करुंज, मावळ) पैलवान भगवान (आण्णा) रघुनाथ लगड यांनी आणि घरातल्या सर्व वडीलधाऱ्यांनी चिमुकल्या प्रांश च्या नामकरण सोहळ्यासाठी चक्क कुस्त्यांचा आखाडा भरवला होता. मावळचे आमदार सुनिल शेळके देखील या आखाड्यासाठी आवर्जून उपस्थित होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
प्रांश प्रशांत लगड या चिमुकल्याच्या नामकरण विधी सोहळ्यानिमित्त या जंगी कुस्त्यांचे मैदानाचे आयोजन रविवार दिनांक 19 मार्च 2023 रोजी राऊतवाडी (पो. करुंज, मावळ) इथे करण्यात आले होते. पैलवान माऊली जमदाडे (महान भारत केसरी) विरुद्ध पैलवान अक्षय शिंदे (उपमहाराष्ट्र केसरी) ही तब्बल 1 लाखाची कुस्ती ही या मैदानाचे खास आकर्षण होती. ( wrestling tournament for the naming ceremony Of Baby in Rautwadi Maval Taluka )
यासह दिनकर लगड, वैभव शेंडगे, समीर जाधव, लक्ष्मण शेंडगे, नितीन शेंडगे, आकाश शेळके यांच्याकडून 6 चांदीच्या गदा बक्षिस म्हणून ठेवण्यात आल्या होत्या. एकंदरीत 43 निकाली कुस्त्या आणि सात महिला कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. मा चेअरमन भगवान रघुनाथ लगड यांच्याकडून इनामात एक दुभती म्हैस देखील देण्यात आली. शंकर रघुनाथ लगड, दिनेश रघुनाथ लगड, उमेश रघुनाथ लगड, हर्षद शंकर लगड हेही या स्पर्धेचे आयोजक होते.
अधिक वाचा –
– ‘पक्ष्यांना अन्नपाणी’, पवनमावळमधील दुर्गम भागातल्या मोरवे जिल्हा परिषद शाळेचा अनोखा उपक्रम
– वडगाव शहरात गुढीपाडवा उत्सवानिमित्त भव्यदिव्य अशा शोभायात्रेचे आयोजन; 350 कलाकार आणि बरंच काही, वाचा अधिक