टाकवे बुद्रुक (प्रतिनिधी) : पतंजली योग समिती मावळ, सेवा फाउंडेशन, गोरक्षक दल, बजरंग दल, सह्याद्री प्रतिष्ठान, येवले फाउंडेशन, टाकवे बुद्रुक ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने योग शिबिराचे आयोजन टाकवे बुद्रुक भैरवनाथ मंदिर इथे करण्यात आले होते. यामध्ये ऋतुदेव महाराज हरिद्वार, अतुल आर्य, गोविंद गाडगीळ यांनी नागरिकांना शेष आजारानुसार योगाचे मार्गदर्शन केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
सदर शिबिरात योगाद्वारे डायबिटीस पूर्ण बरी झालेले पेशंट सुद्धा उपस्थित होते. शिबिरामध्ये मुख्यता गावातील सरपंच सुवर्णा असवले, तुकाराम असवले, अंकुश आंबेकर, तानाजी गुनाट इतर योग साधक होते. कोंडीबा जांभुळकर यांनी आलेल्या पाहुण्यांचे आभार ग्रामस्थांच्या वतीने मानले. तसेच पतंजलीच्या मावळ कार्यकर्त्यांची नियुक्ती करण्यात आली. यामध्ये वंदना कदम, शंकर कुनाट, विश्वास मालपोटे, आशुतोष शाही, संतोष जांभुळकर यांची पद नियुक्ती करण्यात आली. ( yoga camp according to various diseases at Takwe Budruk )
“दि. 1 डिसेंबर ते 25 डिसेंबर असे 25 दिवस आजारानुसार योग प्राणायाम शिबिर सकाळी 6 ते 8 या वेळेत राबवण्यात येणार आहे. यामध्ये मुख्यत: डायबिटीस, मणक्याचे आजार, मुळव्याध, मायग्रेन, हृदयविकार या आजारांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी पुण्याहून योगशिक्षक व शिक्षिका उपलब्ध होणार आहेत. तसेच महिलांसाठी वेगळा योगवर्ग वेगळ्या ठिकाणी असणार आहे. पुरुषांसाठी भैरवनाथ मंदिर या ठिकाणी योगवर्ग होणार आहे. या शिबिरातून रोगी व्यक्तीस निरोगी व निरोगी व्यक्तीस सहयोग शिक्षक बनवण्यात येणार आहे. ज्याचा फायदा त्यांना पुढे होणार आहे व त्यांना पतंजलीचे योगशिक्षक सर्टिफिकेट देण्यात येणार आहे. आपल्या आरोग्यासाठी या भागातील सर्व नागरिकांनी 25 दिवसाच्या योग प्रशिक्षणामध्ये सामील होऊन आपले आरोग्य सदृढ बनवावे,” असे योग प्रशिक्षक संतोष जांभुळकर यांनी सांगितले आहे.
अधिक वाचा –
– मावळमधून महायुतीचा उमेदवार मीच… आणि विजय देखील माझाच! खासदार श्रीरंग बारणेंचा यल्गार
– आमदार सुनिल शेळके यांच्या माध्यमातून आंदर मावळातील रस्त्यासाठी 1 कोटी 90 लाखाची निधी
– धर्मवीर संभाजी नागरी सहकारी पतसंस्थेच्या चेअरमनपदी विनोद टकले, पाहा संपूर्ण कार्यकारिणी