Dainik Maval News : मावळ तालुक्यातील सांगवी येथे प्रेमविवाहातून झालेल्या हल्ला प्रकरणातील दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तसेच एक आरोपी अद्याप फरार आहे. वडगाव मावळ पोलिसांनी ही कारवाई केली. वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार कदम यांनी याबाबत माहिती दिली.
- सांगवी गावच्या हद्दीत अनुष्का हॉटेलजवळ ही धक्कादायक घटना 5 एप्रिलला रात्री 8 वाजता घडली होती. प्रेमविवाह केलेल्या युवकावर त्याच्या पत्नीच्या नातेवाईकांनीच प्राणघातक हल्ला केला होता.
संकेत मारुती तोडकर (29, रा. तोडकर आळी, सांगवी) हे आपल्या चुलत भावासह स्कुटीवर बसून गावातील यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करत असताना, शिवराज बंडू जाधव याने आपल्या बहिणीशी झालेल्या प्रेमविवाहाचा राग मनात धरून इतर दोन आरोपी यश अजय जाधव (22) आणि विशाल पाथरवट यांच्या मदतीने स्कुटीला मोटारसायकलने धडक दिली.
- दरम्यान त्यानंतर तिघांनी मिळून कोयता, लोखंडी रॉडने संकेत तोडकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला. हल्ल्यात संकेत यांच्या उजव्या हाताचा दंड, खांदा आणि डोक्यावर गंभीर मारहाण करण्यात आली होती. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले होते. सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.
या प्रकरणानंतर पोलीसांनी कडक कारवाई केली आहे. पोलिसांनी आरोपी यश अजय जाधव (22) आणि विशाल पाथरवट यांना अटक केली आहे. तसेच, शिवराज बंडू जाधव हा अद्याप फरार आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates