व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, June 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

नदी प्रदूषण, रेल्वे संदर्भातील प्रश्न मार्गी लावण्यासाठी अधिवेशन फलदायी ठरले ; खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती । Maval Lok Sabha

मावळ लोकसभा मतदारसंघातील मुठा, मुळा, इंद्रायणी, पवना आणि उल्हास या नद्यांचे सुधार प्रकल्प, लोकल सह रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरले आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 9, 2025
in मावळकट्टा, ग्रामीण, ग्रामीण, पुणे, लोकल, शहर
Shiv Sena Shinde Faction Maval MP Shrirang Barne

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : मावळ लोकसभा मतदारसंघातील मुठा, मुळा, इंद्रायणी, पवना आणि उल्हास या नद्यांचे सुधार प्रकल्प, लोकल सह रेल्वेचे विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी अर्थसंकल्पीय अधिवेशन फलदायी ठरले आहे. यासह बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळमधून मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी होत आहे. त्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. त्यासंदर्भातही अधिवेशनात आवाज उठविल्याची माहिती मावळचे शिवसेना खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.

Novel NIBR Ads

केंद्र सरकारचे अर्थसंकल्पीय अधिवेशन नुकतेच संपले. या अधिवेशनात खासदार बारणे यांनी मतदारसंघासह देशाच्या सुरक्षिततेसंदर्भात विविध प्रश्नांवर आवाज उठविला. याबाबतची माहिती खासदार बारणे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनांना त्वरित मंजुरी द्यावी.

  • इंद्रायणी नदीचा उगम मावळमधून होतो. नदी देहू-आळंदी तीर्थक्षेत्रातून वाहते. वारकरी संप्रदायातील भाविक याच पवित्र नदीत स्नान करतात. त्यामुळे पवना व इंद्रायणी नदी सुधार योजनांना त्वरित मंजुरी मिळावी, अशी मागणी केली. त्याला सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. नद्यांचे वाढते प्रदूषण रोखण्यासाठी राज्य सरकारच्या अखत्यारित येणाऱ्या महानगरपालिका, नगरपरिषद आणि जिल्हा परिषदेला नदी स्वच्छतेचा कार्यक्रम सोपवावा, अशीही केली.

आकुर्डी, चिंचवड, तळेगाव, लोणावळा व पनवेल जंक्शन ही महत्त्वाची रेल्वे स्थानके ‘अमृत भारत स्टेशन’ योजनेत समाविष्ट करून त्यांचा दर्जा वाढवावा. कोरोना काळानंतर बंद झालेली दुपारी 1:30 ची पुणे-लोणावळा लोकल सेवा पुन्हा सुरू करावी. जेणेकरून विद्यार्थी, महिला व कामगार वर्गाला याचा लाभ होईल. तिसऱ्या व चौथ्या लेनचे काम तात्काळ सुरू करावे. पनवेल-कर्जत नवीन रेल्वे मार्ग जलद गतीने पूर्ण व्हावा.

  • पनवेल ते लोणावळा दरम्यान तिसरा-चौथा मार्ग तयार करून नवीन विमानतळाशी चांगली जोडणी व्हावी. नेरळ-माथेरान टॉय ट्रेन सेवा पूर्वी 1-2 तासांत पूर्ण होत असे, पण आता तीन तास लागतात. या सेवेत सुधारणा करण्याची आवश्यकता आहे. कोरोना काळात थांबवलेल्या ज्येष्ठ नागरिकांच्या तिकीट सवलती पुन्हा सुरू कराव्यात, यासाठी सरकारकडे आग्रह धरला आहे. याबाबत रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. त्यामुळे हे प्रश्न लवकरच मार्गी लागतील, असा विश्वास खासदार बारणे यांनी व्यक्त केला.

हरित इंधनासाठी नवीन धोरणांची अंमलबजावणीची मागणी
भारताच्या ऊर्जा सुरक्षेसाठी सीबीजी’ महत्त्वाची भूमिका बजावू शकते, तसेच जैविक इंधनामुळे पर्यावरण संवर्धन होईल आणि कृषी क्षेत्राला आर्थिक आधार मिळेल. त्यामुळे पुढील ५ वर्षांत किती नवीन प्रकल्प सुरू होतील याचे ठोस नियोजन करावे. केंद्र सरकार बायो सीएनजी, हायड्रोजन इंधनांना चालना देत आहे. यामुळे पारंपरिक पेट्रोल-डीझेलवरील अवलंबित्व कमी होईल आणि पर्यावरणपूरक पर्याय उपलब्ध होतील.

  • हरित इंधनासाठी नवीन धोरणे आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक आहे. दीर्घकालीन ऊर्जा सुरक्षेसाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्याय स्वीकारण्याची गरज. स्वच्छ ऊर्जा संकल्पनांचा व्यापक आणि प्रभावी उपयोग महत्त्वाचा आहे, तसेच ऊर्जा स्रोतांचा सुयोग्य वापर करून देशाच्या प्रगतीला गती दिली पाहिजे. पेट्रोल-डीझेलऐवजी शाश्वत इंधनाचा अधिकाधिक वापर करण्यावर भर देण्याचीही मागणी केल्याचे खासदार बारणे यांनी सांगितले.

ईपीएस’ धारकांना नऊ हजार रुपये पेन्शन
देशातील औद्योगिक, सार्वजनिक,सहकारी, खासगी क्षेत्रातील 67 लाख सेवानिवृत्त ‘ईपीएस’ कर्मचारी पेन्शनधारक आहेत. त्यांना अंत्यत तुटपुंजे केवळ एक हजार रुपये पेन्शन मिळते. मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठीही अपुरे आहे. त्यामुळे सर्व ‘ईपीएस’ 95 निवृत्तीवेतनधारक आणि त्यांच्या जोडीदारांना मोफत वैद्यकीय सुविधांची तरतूद तसेच या योजनेत समाविष्ट नसलेल्या सेवानिवृत्त कर्मचार्‍यांसह त्यांना नऊ हजार रुपये पेन्शन देण्याची मागणीही खासदार श्रीरंग बारणे यांनी केली.

Novel NIBR Ads

देशाला भेडसावणारा अवैध घुसखोरीवर आवाज
बांगलादेश, पाकिस्तान, म्यानमार आणि नेपाळमधून मोठ्या प्रमाणात अवैध घुसखोरी होत आहे. ज्यामुळे राष्ट्रीय सुरक्षा धोक्यात येते. गुन्हेगारी, दहशतवादी कारवाया वाढण्याची शक्यता असते. तसेच, स्थानिक नागरिकांच्या हक्कांवर परिणाम होतो आणि सामाजिक तणाव निर्माण होतो. त्यासाठी इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025: राष्ट्रीय सुरक्षेसाठी ठोस पाऊल

संसदेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 चे समर्थन केले. हे विधेयक देशाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे असून, अवैध घुसखोरी रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करते, ज्यामुळे सीमा अधिक सुरक्षित होतील आणि नागरिकांचे हित संरक्षित राहील, असेही बारणे म्हणाले.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– ‘पवना कृषक’वर भाजपाची सत्ता ! सर्वपक्षीय नेत्यांच्या राजकारणाला अपयश, सिनेमाला लाजवेल अशा घडामोडी, वाचा सविस्तर
– दिव्यांग नागरिकांना हक्काचा निवारा मिळावा यासाठी राज्य शासन स्वतंत्र घरकुल योजना तयार करणार
– पवना नदी परिसरातील बेकायदेशीर बांधकामावर अतिक्रमणविरोधी कारवाईचा हातोडा ! Pavana Dam Updates


dainik maval jahirat

Previous Post

तळेगावच्या आठवडे बाजारात होणारी वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी नियोजन बैठक संपन्न । Talegaon Dabhade

Next Post

प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला ; वडगाव मावळ पोलिसांकडून आरोपींना अटक । Vadgaon Maval

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
crime-arrested

प्रेमविवाहाच्या कारणावरून तरुणावर प्राणघातक हल्ला ; वडगाव मावळ पोलिसांकडून आरोपींना अटक । Vadgaon Maval

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Talegaon Dabhade Conclusion of Shri Swami Samarth Namjap ceremony held to mark Adhik Maas

तळेगाव दाभाडे : अधिक मासानिमित्त १ कोटी २५ लाख श्री स्वामी समर्थ नामजप सोहळ्याची भक्तिमय वातावरणात सांगता

June 14, 2026
New District Executive Committee of Bharatiya Janata Party BJP Mahila Morcha Pune North District announced

भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, पुणे उत्तर जिल्ह्याची नूतन जिल्हा कार्यकारिणी जाहीर; कार्यकारिणीत मावळचा दबदबा

June 14, 2026
Women farmers to get distinct identity Women Farmers Empowerment Bill to be tabled during monsoon session

महिला शेतकऱ्यांना मिळणार स्वतंत्र ओळख; राज्याच्या पावसाळी अधिवेशनात सादर होणार ‘महिला शेतकरी सक्षमीकरण विधेयक’

June 14, 2026
Gutkha manufacturers will be subject to MCOCA in new year said Minister Narhari Zirwal informed

गुटखा व्यवसाय करणाऱ्यांवर आता ‘मकोका’ अंतर्गत कठोर कारवाई होणार ; अन्न व औषध प्रशासनाचे महत्त्वपूर्ण पाऊल

June 14, 2026
Transport vehicles carrying silt from lake should not be obstructed directives from Minister Sanjay Rathod

तलावातील गाळ वाहून नेणाऱ्या वाहतुकीची अडवणूक करू नये; मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे निर्देश

June 14, 2026
Entry ban for heavy vehicles in Lonavala

महत्वाची बातमी ! पुणे शहरात १५ ते २४ जूनदरम्यान जड-अवजड वाहनांच्या प्रवेशास बंदी

June 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.