Dainik Maval News : कौटुंबिक कारणातील रागातून एका तरूणाला कोयते व लोखंडी रॉड च्या सहाय्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील सांगवी गाव हद्दीत घडली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 3 (5) आर्म ॲक्ट 4 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संकेत मारुती तोडकर (वय 29 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समोर, तोडकर आळी, सांगवी, ता. मावळ) असे जखमी तरूणाचे व फिर्यादीचे नाव असून त्याने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी, आरोपी शिवराज बंडू जाधव (रा. सांगवी, ता. मावळ), यश अजय जाधव (वय 22 वर्षे रा. सांगवी, ता. मावळ) व विशाल पाथरवट (रा. वडगाव मावळ, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
- पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ नवनाथ तोडकर यांच्यासह वडगाव मावळ ते सांगवी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेल जवळ स्कुटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करीत होते. त्यावेळी आरोपीत शिवराज बंडू जाधव याने जुन्या कौटुंबिक कारणातील राग मनात धरून आरोपी यश अजय जाधव व विशाल पाथरवट यांच्याशी संगनमत करून तिघांनी मोटरसायकलवर येऊन पाठीमागून फिर्यादी बसलेल्या स्कुटीला धडक देऊन त्यांना खाली पाडले.
त्यानंतर शिवराज बंडु जाधव व यश अजय जाधव यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर, अंगट्यावर व डाव्या हाताचे खांद्यावर वार केले. विशाल पाथरवट याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यावर, मानेवर व पाठीवर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.
प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या आदेशान्वये पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार डोईजड हे करीत आहेत.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number