व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, March 6, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

जुन्या रागातून तरूणाला बेदम मारहाण, मावळमधील सांगवी गावातील धक्कादायक प्रकार ; तिघांवर गुन्हा दाखल । Vadgaon Maval

कौटुंबिक कारणातील रागातून एका तरूणाला कोयते व लोखंडी रॉडच्या सहाय्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील सांगवी गाव हद्दीत घडली आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
April 7, 2025
in लोकल, ग्रामीण, शहर
Crime

File Photo : Crime


Dainik Maval News : कौटुंबिक कारणातील रागातून एका तरूणाला कोयते व लोखंडी रॉड च्या सहाय्याने बेदम मारहाण करून जखमी केल्याची धक्कादायक घटना मावळ तालुक्यातील सांगवी गाव हद्दीत घडली आहे. याप्रकरणी वडगाव मावळ पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम 109, 3 (5) आर्म ॲक्ट 4 (25) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संकेत मारुती तोडकर (वय 29 वर्षे, रा. विठ्ठल रुक्मिणी मंदीर समोर, तोडकर आळी, सांगवी, ता. मावळ) असे जखमी तरूणाचे व फिर्यादीचे नाव असून त्याने वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी, आरोपी शिवराज बंडू जाधव (रा. सांगवी, ता. मावळ), यश अजय जाधव (वय 22 वर्षे रा. सांगवी, ता. मावळ) व विशाल पाथरवट (रा. वडगाव मावळ, ता. मावळ) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री आठच्या सुमारास फिर्यादी हे त्यांचे चुलत भाऊ नवनाथ तोडकर यांच्यासह वडगाव मावळ ते सांगवी रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या एका हॉटेल जवळ स्कुटीवर बसून गावच्या यात्रेच्या वर्गणीचा हिशोब करीत होते. त्यावेळी आरोपीत शिवराज बंडू जाधव याने जुन्या कौटुंबिक कारणातील राग मनात धरून आरोपी यश अजय जाधव व विशाल पाथरवट यांच्याशी संगनमत करून तिघांनी मोटरसायकलवर येऊन पाठीमागून फिर्यादी बसलेल्या स्कुटीला धडक देऊन त्यांना खाली पाडले.

त्यानंतर शिवराज बंडु जाधव व यश अजय जाधव यांनी त्यांच्या हातातील कोयत्याने फिर्यादी यांचे उजव्या हाताच्या दंडावर, पोटरीवर, अंगट्यावर व डाव्या हाताचे खांद्यावर वार केले. विशाल पाथरवट याने त्याच्या हातातील लोखंडी रॉडने फिर्यादीचे डोक्यावर, मानेवर व पाठीवर मारून त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न केला, असे फिर्यादीत नमूद आहे.

प्राप्त फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून वरीष्ठ पोलीस निरीक्षक कुमार कदम यांच्या आदेशान्वये पुढील तपास सहाय्यक पोलीस निरिक्षक शितलकुमार डोईजड हे करीत आहेत.

( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : पुणे – लोणावळा रेल्वे मार्गावर 3 दिवसांचा ब्लॉक, लोकलसह एक्स्प्रेस गाड्यांच्या वेळापत्रकात बदल । mega block on central railway
– आयपीएस सत्यसाई कार्तिक यांच्या बदलीच्या एक महिन्यानंतरही उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याची खूर्ची रिकामीच । Lonavala News
– पर्यटनासाठी येताय? मग 9850112400 हा नंबर सेव्ह करून ठेवा ; लोणावळा पोलिसांकडून पर्यटकांसाठी हेल्पलाइन नंबर सुरू । Lonavala Tourist Helpline Number


Previous Post

श्री जैन स्थानकवासी श्रावक संघाच्या अध्यक्षपदी सुभाषचंद्र अंबरचंद मुथा यांची निवड । Vadgaon Maval

Next Post

विरुद्ध दिशेने येऊन गाडी ठोकली, नुकसान भरपाई मागितल्यावर मारहाण केली, सोमाटणे फाटा येथील गंभीर प्रकार

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Biker beaten up for demanding compensation Incident at Somatane Phata Maval

विरुद्ध दिशेने येऊन गाडी ठोकली, नुकसान भरपाई मागितल्यावर मारहाण केली, सोमाटणे फाटा येथील गंभीर प्रकार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Vadgaon Maval police teams raided leaf shops illegal tobacco products seized 16 cases filed

वडगाव मावळ पोलिसांच्या पथकांचे पान टपऱ्यांवर छापे ; बेकायदेशीर तंबाखूजन्य पदार्थ जप्त, 16 खटले दाखल

March 6, 2026
whole Maval was shocked Two Youth who were going to bring Shiv Jyot died in road accident Wadeshwar village

संपूर्ण मावळ हळहळला ! शिवज्योत आणण्यासाठी निघालेल्या दोन शिवभक्तांचा रस्ते अपघातात मृत्यू, वडेश्वर गावावर शोककळा

March 6, 2026
Maharashtra Legislature Vidhan Bhavan

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री ३० जूनपूर्वी शेतकरी कर्जमाफीचा निर्णय जाहीर करतील – कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

March 5, 2026
Accident

भरधाव कारची दुचाकीला धडक बसल्याने दुचाकीवरील एकाचा मृत्यू ; बधलवाडी – नवलाख उंबरे मार्गावरील घटना

March 5, 2026
10th standard exam In Maval taluka 7047 students solved Marathi paper SSC Exam 2025

इयत्ता चौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरिता नोंदणी आणि आवेदनपत्र भरण्यासाठी मुदतवाढ ; ‘या’ तारखेपर्यंत भरता येणार अर्ज

March 5, 2026
Maval Taluka Agricultural Produce Market Committee Chairman Sambhaji Shinde resigns

मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संभाजी शिंदे यांचा राजीनामा ! जिल्हा उपनिबंधक यांच्याकडे सोपविला राजीनामा

March 5, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.