Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथे 30 वर्षीय युवकाला पिस्तूल, रिव्हॉल्व्हर आणि जिवंत काडतूसांसह अटक करण्यात आली आहे. सोमवारी (दि.16 सप्टेंबर) रात्री साडेअकराच्या सुमारास खळदे नगर येथे पिंपरी – चिंवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली. अक्षय प्रभाकर साबळे (वय 30, रा. खळदे नगर, तळेगाव दाभाडे) असे अटक करण्यात आलेल्या युवकाचे नाव आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
पोलीस शिपाई संकेत प्रकार घारे (वय 30) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांत फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी आरोपी अक्षय प्रभाकर साबळे (वय 30, रा. खळदे नगर, तळेगाव दाभाडे) यास अटक करून त्याच्या विरोधात भारतीय शस्त्र अधिनियन कलन 3, 25 सह महाराष्ट्र पोलीस कायदा कलम 37 (1) (3) सह 135 अन्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी रात्री साडेअकराच्या सुमारास पोलिसांनी केलेल्या कारवाईत आरोपी अक्षय साबळे हा त्याच्या ताब्यात 50 हजार रुपये किमतीचे देशी बनावटीचे पिस्तूल, 50 हजार रुपये किमतीचे रिव्हॉल्व्हर आणि 1 हजार 500 रुपये किमतीचे 3 जिवंत काडतून असेल एकूण 1 लाख 1 हजार 500 रुपयांचे माल बाळगताना मिळून आला. पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्लायाचे मनाई आदेश डावलून त्याने शस्त्र बाळगल्याचे पोलिसांनी सांगितले. याप्रकरणी पोलिस उपनिरिक्षक गोसावी हे पुढील तपास करत आहेत.
अधिक वाचा –
– वडगाव शहरातील मंडल अधिकारी व तलाठी अधिकारी कार्यालयाचे लोकार्पण । Vadgaon Maval
– आढले खुर्द येथे 3 लाख 94 हजार रुपये निधीतून होणाऱ्या विकासकामांचे उद्घाटन । Maval News
– कान्हे येथील नवीन उपजिल्हा रुग्णालयाला माजी आमदार स्व. रघुनाथराव सातकर यांचे नाव देण्याची आग्रही मागणी । Maval News