मुंबई भागातून पवना धरण परिसरात फिरायला आलेल्या 18 सदस्यांच्या ग्रुपमधील एक तरुण पवना धरण जलाशयात बुडाल्याची माहिती समोर येत आहे. साहिल विजय सावंत (वय 18, रा. लोअर परेल, मुंबई) असे धरणात बुडालेल्या तरुणाचे नाव असून मावळ तालुक्यातील आपदा मित्र, वन्यजीव रक्षक मावळ संस्था, शिवदुर्ग मित्र मावळ आणि लोणावळा ग्रामीण पोलिस यांच्याकडून सदर तरुणाचा शोध घेतला जात असल्याची माहिती सुनिल गायकवाड यांनी दैनिक मावळ सोबत बोलताना दिली.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई भागातील 9 युवक आणि 9 युवतींचा ग्रुप काल शनिवारी (दिनांक 22 एप्रिल) रोजी लोणावळा परिसरात फिरण्यासाठी आला होता. लोणावळा परिसर फिरून झाल्यांनतर हा ग्रुप पवना धरण परिसर फिरण्यासाठी आले. त्यावेळी ते फांगणे गावच्या हद्दीतील पवना धरण जलाशयात पोहोण्यासाठी उतरले असता यापैकी साहिल हा पाण्यात बुडाला अशी प्राथमिक माहिती आहे. सध्या त्याचा शोध घेतला जात आहे. ( Youth drowned in Pavana dam maval taluka )
अधिक वाचा –
– कोरोना अलर्ट : मुंबई पुण्यासह 10 जिल्ह्यांवर विशेष लक्ष द्यावे, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या कोविड टास्क फोर्सला सूचना
– चोरीला गेलेली ‘लक्ष्मी’ अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पुन्हा दारी; वडगाव मावळ पोलिसांकडून 32 वाहने मूळ मालकांना सुपूर्द