मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांच्या पुढाकारातून महाराष्ट्र शासनाच्या वतीने राज्यात ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या उपक्रमाअंतर्गत मावळ तालुक्यातील कान्हे येथील जिल्हा परिषद शाळेने तालुकास्तरावर चमकदार कामगिरीची नोंद करत अव्वल नंबर पटकावला आहे. ‘माझी शाळा – सुंदर शाळा’ उपक्रमात जिल्हा परिषदेची तालुक्यातील आदर्श शाळा असलेल्या कान्हे शाळेने तालुकास्तरावर प्रथम क्रमांक पटकावत तीन लाखाचे पारितोषिक आपल्या नावे केले आहे. शाळेच्या ह्या यशाबद्दल मुख्याध्यापक, सर्व अध्यापक आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले जात आहे. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
कान्हे शाळेने अगोदर केंद्र स्तरावर प्रथम क्रमांक मिळवला आणि त्यानंतर तालुका स्तरावर झालेल्या तपासणी दरम्यान मावळ तालुक्यातून सर्वाधिक 96 गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळवला. यासह कान्हे शाळा तीन लाखाच्या बक्षीसास पात्र ठरली आहे. मावळ तालुक्यात यशस्वी घोडदौड केल्यानंतर पुणे जिल्हा स्तरावरही बाजी मारण्यासाठी कान्हे शाळेने तयारी सुरु केली आहे. (Zilla Parishad Kanhe School ranked first in Maval Taluka in Mazi Shala Sundar Shala Activity)
ह्यात कान्हे गाव ग्रुप ग्रामपंचायत, शाळा व्यवस्थापन समिती, ग्रामस्थ, पालक, परिसरातील सीएसआर फंड देणाऱ्या विविध कंपन्या, सेवाभावी संस्था ह्यांचे मोलाचे सहकार्य विद्यार्थी आणि शिक्षकांना लाभल्याचे मुख्याध्यापकांनी सांगितले. शाळेच्या यशस्वितेसाठी सतत मार्गदर्शन करणारे पंचायत समितीचे गट विकास अधिकारी सुधीर भागवत, गट शिक्षण अधिकारी सुदाम वाळुंज, विस्तार अधिकारी शोभा वहिले, केंद्रप्रमुख अजित नवले या सर्वांचे शाळेच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले.
गुरुवारी (दि. 22 फेब्रुवारी) कान्हे शाळेची पुणे जिल्हा स्तरीय स्पर्धेसाठी जिल्हा पथकाकडून तपासणी करण्यात आली. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपशिक्षणाधिकारी काळे साहेब, डायटचे अधिव्याख्याता प्रभाकर क्षीरसागर साहेब यांनी शाळेचे मूल्यांकन केले. तसेच शाळेच्या सर्व भौतिक सुविधा आणि सर्व रेकॉर्ड तसेच गुणवत्ता याबद्दल मनापासून समाधान व्यक्त करत कान्हे शाळेला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक वाचा –
– वळक गावात बांधले जाणार भव्य बुद्ध विहार, आमदार सुनिल शेळकेंच्या माध्यमातून 20 लाखांचा निधी मंजूर, भूमिपूजनही संपन्न
– इंद्रायणीच्या डोहात उडी मारून अज्ञात व्यक्तीची आत्म’हत्या । Talegaon Dabhade
– मावळकन्येची दमदार कामगिरी! वेदांगी असवले हिने मिळवला आंदर मावळातून प्रथम सीए बनवण्याचा मान । Maval News