Dainik Maval News : मावळ तालुक्यात सहकार क्षेत्रात अग्रेसर असलेल्या मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश देण्याचा एकमुखी ठराव नुकत्याच झालेल्या वार्षिक सर्वसाधारण सभेत करण्यात आला. या निर्णयाचे सभासदांनी जोरदार स्वागत केले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेची 28वी वार्षिक सर्वसाधारण सभा पतसंस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. सभेला खजिनदार विनायक कदम, सचिव अविनाश पाटील, संचालक महेंद्र जयस्वाल, समीर खांडगे, राजू खांडभोर, सुहास गरुड, रमेश जाधव, प्रशांत भागवत तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ञ रत्नाकर गायकवाड, आनंद शेलार, सोनबा गोपाळे, सुनील वाळूज उपस्थित होते.
संस्थेचे उपाध्यक्ष नंदकुमार शेलार यांनी उपस्थित सभासदांचे स्वागत केले. सचिव अविनाश पाटील यांनी संस्थेच्या वार्षिक हिशोब पत्रकाचे वाचन केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गेली अठ्ठावीस वर्ष संस्था कार्यरत असून स्थापनेपासून आजअखेर संस्थेचा तपासणी अहवालाचा अ वर्ग कायम आहे. संचालक सुहास गरुड यांनी आभार मानले.
अधिक वाचा –
– मतदान केल्यावर मतदानाची खात्री व्हीव्हीपॅट मशीनद्वारे करावी, कार्ला येथे मतदारांसाठी प्रात्याक्षिक मोहीम । karla News
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade