व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Friday, August 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

तळेगाव येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वार्षिक सभेत सभासदांना लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

तळेगाव दाभाडे येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
September 22, 2024
in लोकल, शहर
Narayanarao Kalokhe Credit Institution Talegaon

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : तळेगाव दाभाडे येथील नारायणराव काळोखे नागरी सहकारी पतसंस्थेची 31 वी वार्षिक सर्वसाधारण सभा नुकतीच पार पडली. या सभेत पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर करण्यात आला. पतसंस्थेचा कर्जदार वर्ग हा समाजातील सर्वसामान्य घटक असून सभासदांच्या मुलांसाठी आणि सभासदांसाठी आपण कल्याणकारी योजना राबविणार असल्याचे प्रतिपादन संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, ज्येष्ठ उद्योजक विलास बबनराव काळोखे यांनी केले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

नारायणराव काळोखे पतसंस्था ही गेली 31 वर्षे तळेगाव शहरातील छोटे व्यवसायिक, पथारीवाले, लघु उद्योजक, हातगाडी वाले, भाजी विक्रेते इत्यादींना अल्प मध्यम आणि दीर्घ मुदतीचा कर्जपुरवठा सातत्याने करत आहे. कार्यक्रमादरम्यान सभासदांच्या विशेष गुणवत्ता प्राप्त पाल्यांना सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. तर नियमितपणे कर्ज फेडणाऱ्या व उत्तम कामगिरी करणाऱ्या दैनंदिन प्रतिनिधींना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. संस्थेला 31 वर्ष पूर्ण झाले असून सध्या 1869 सभासद आहेत.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे उपाध्यक्ष सूर्यकांत काळोखे यांनी केले, सेक्रेटरी विश्वनाथ काळोखे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. तज्ञ संचालक संजय संदानशिव यांनी अहवाल वाचन करून सभासदांच्या प्रश्नांना समर्पक उत्तरे दिली. सुरेश शेंडे, भगवान शिंदे, संजय मेहता, दिलीप पारेख इत्यादी सभासदांनी संस्थेच्या हिताच्या सूचना व्यक्त केल्या. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी व्यवस्थापिका रोहिणी नाटक, संध्या मांदळे, चंद्रकांत चव्हाण यांनी विशेष परिश्रम घेतले. स्नेहभोजनाने सभेची सांगता झाली.

अधिक वाचा –
– यावेळी सव्वा लाखाहून अधिकचे मताधिक्य मिळणार ; आमदार सुनिल शेळके यांच्या दाव्यामुळे विरोधकांचे धाबे दणाणले । MLA Sunil Shelke
– आदिवासी बांधवांना हक्काची घरे मिळवून देण्यासाठी रविंद्र भेगडे सरसावले । BJP Ravindra Bhegade
– वडगाव नगरपंचायतीचा ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रम, अधिकारी – कर्मचारी यांच्याकडून वृक्षलागवड । Vadgaon Maval


dainik maval jahirat

Previous Post

लोणावळ्यात दिसली सामान्यांची ताकद, आमदार शेळकेंसह सर्वपक्षीयांचा सहभाग, मुख्याधिकाऱ्यांना पाठवलं रजेवर । Lonavala Nagar Parishad

Next Post

तळेगावमधील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Mamasaheb Khandge Credit Institution Talegaon

तळेगावमधील मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या सभासदांना 10 टक्के लाभांश जाहीर । Talegaon Dabhade

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Video Struggle for road continues in Maval Taluka sick person has to be carried in makeshift sling

व्हिडिओ : स्वातंत्र्याच्या ७९ वर्षांनंतरही मावळ तालुक्यात रस्त्यासाठी संघर्ष ; आजारी व्यक्तीला झोळीतून नेण्याची वेळ

August 13, 2026
Demand to celebrate birth anniversary of pioneering revolutionary Raje Umaji Naik in maval taluka

आद्य क्रांतीवीर राजे उमाजी नाईक यांची जयंती तालुक्यातील सर्व शासकीय कार्यालये, ग्रामपंचायतींमध्ये साजरी करण्याची मागणी

August 13, 2026
Tiranga-National-Flag-India

शनिवारी १५ ऑगस्ट रोजी राज्यभरात उत्साहात साजरा होणार ८० वा स्वातंत्र्यदिन ; सकाळी ९.०५ वाजता शासकीय ध्वजारोहण

August 13, 2026
Chandrashekhar-Bawankule

मोठी बातमी! सातबारावर नाव नसलेल्या शेतकऱ्यांच्या नोंदी तयार करा; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे आदेश

August 13, 2026
Complete measures to resolve traffic issues in Talegaon-Chakan industrial area by August 31

तळेगाव-चाकण औद्योगिक क्षेत्रातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी ३१ ऑगस्टपर्यंत उपाययोजना पूर्ण करा

August 13, 2026
Revenue Minister Chandrashekhar Bawankule

भटक्या, विमुक्त समाजाला विशेष शिबिरांच्या माध्यमातून मिळणार दाखले ; महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा

August 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.