आई एकविरादेवी मंदिराच्या पायथ्याशी असणाऱ्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वेहेरगाव, ह्या शाळेचा शताब्दी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शताब्दी वर्षपूर्ती निमित्त माजी शिक्षक आणि विद्यार्थी यांनी एकत्रित येत केक कापून शाळेचा शंभरावा वाढदिवस साजरा केला. तसेच फटाक्यांची आतिषबाजी करत आणि 100 विद्यार्थ्यांनी 100 फुगे हवेत सोडून आगळ्यावेगळ्या पद्धतीने शताब्दी सोहळा साजरा केला. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
खूप वर्षांनी शाळेतील सर्व गुरुजन आणि त्यांचे विद्यार्थी यांची भेट या कार्यक्रमाच्या निमित्ताने घडली. त्यामुळे सर्वजण आनंदीत होते, तर अनेकांनी जुन्या आठवणींना उजाळा दिला. शाळेतील विद्यार्थिनींनी माजी शिक्षकांचे औक्षण करून स्वागत केले. तर उपस्थित माजी शिक्षक आणि माजी विद्यार्थ्यांनी प्रसंगी आपले मनोगत व्यक्त केले. ( 100th Anniversary Of Zilla Parishad School Vehergaon Celebrated With Enthusiasm )
वेहरगावच्या सरपंच वर्षा मावकर, उपसरपंच शंकर बोरकर, केंद्रप्रमुख सुहास विटे, माजी उपसरपंच काजल पडवळ, ग्राम पंचायत सदस्य राजु देवकर, अनिल गायकवाड, सदस्या पुजा पडवळ, शालेय समिती अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष लिना रसाळ, पोलिस पाटील अनिल पडवळ, मुख्याध्यापिका निलीमा वरे आदिजण यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर शाळेचे सध्याचे शिक्षकवृंद आणि विद्यार्थीही कार्यक्रमात सहभागी होते.
सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष देवकर, उपाध्यक्ष लीनाताई रसाळ तसेच सर्व व्यवस्थापन सदस्य यांनी अतिशय मोलाचे सहकार्य केले. मान्यवरांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका निलीमा वारे यांनी केले. प्रास्ताविक कल्याणी रासकर, सूत्रसंचालन विकास कांबळे आणि कविता चासकर यांनी केले. तर, कार्यक्रमाअंती उपस्थितांचे आभार श्रीमती मनिषा कांबळे यांनी मानले.
अधिक वाचा –
– सोमाटणे-परंदवडी रस्ता ते सोमाटणे गावठाण रस्त्यासाठी 2 कोटी 91 लाखांचा निधी; आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन
– सुदुंबरे येथील सिद्धांत महाविद्यालयात शिक्षकांसाठी क्षमता वृद्धी प्रशिक्षण सत्र; नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या पार्श्वभूमीवर उपक्रम
– शिवली-भडवली ग्रामपंचायतीमध्ये सत्ताधारी पॅनलला झटका! सरपंचपदाच्या निवडणूकीत माधुरी आडकर विजयी । Gram Panchayat Election