इनर व्हील क्लबचा दिनांक 10 जानेवारी रोजी वर्धापन असतो. यंदाचे इनर व्हील क्लबचे शंभरावे वर्ष आहे. त्यानिमित्त जगभरात इनर व्हील क्लबच्या शाखांमार्फत कार्यक्रम आयोजित करण्यात आले. इनर व्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या सदस्यांनी 100व्या इनर व्हील डे निमित्त पवनानगर इथे एकदिवसीय सहलीचे आयोजन करून क्लबचा शंभरावा वर्धापन दिन साजरा केला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
क्लबच्या शताब्दी वर्षानिमित्त तळेगाव शाखेच्या अध्यक्षा संध्या थोरात यांनी सदस्यांसोबत हा क्षण साजरा करण्याचे ठरवले. त्यासाठी खास नियोजन केले. यात अल्भा पारेख, जयश्री दाभाडे आदी सभासदांनी त्यांना मोलाची मदत केली. इनरव्हील क्लब म्हणजे सेवा आणि मैत्रीभाव जपणारी संस्था. सद्यमितीस क्लबच्या 100 हून अधिक देशात आणि हजारो शाखा आहेत. इनरव्हील क्लबच्या माध्यमातून गरजूंच्या अडचणी सोडवण्याचा नेहमीच प्रयत्न केला जातो. ( 100th Inner Wheel Day was celebrated at Pavananagar by Inner Wheel Club of Talegaon Dabhade )
इनरव्हील क्लब ऑफ तळेगाव दाभाडेचे तर हे 26 वे वर्ष आहे. त्यामुळे ‘शाईन अ लाईट’ या थीमनुसार अध्यक्षा संध्या थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली क्लबचे काम सुरु आहे. त्यातच क्लबचा 100 वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पवनानगर येथील निसर्गरम्य ठिकाणी विशेष नियोजन करण्यात आले. केक कापून 100वा इनरव्हील डे साजरा करण्यात आला. चेअरमन रचना मालपाणी यांनी यावेळी फोनवरून शुभेच्छा दिल्या. अध्यक्षा थोरात यांच्यासह निशा पवार, भाग्यश्री काळेबाग, अल्भा पारेख, डॉ. दिपाली झंवर, वैशाली जामखेडकर, मोहिनी भेगडे, साधना भेगडे, ज्योती जाधव, जयश्री दाभाडे, प्रियदर्शनी मानकर, शितल शेटे आदी यावेळी उपस्थित होत्या.
अधिक वाचा –
– राष्ट्रीय युवा दिनानिमित्त भाजपाकडून रक्तदान शिबिर; रविंद्र भेगडेंसह अन्य पदाधिकाऱ्यांनीही केले रक्तदान । Vadgaon Maval
– मळवंडी ठुले ग्रामस्थांची 40 वर्षांपासूनची मागणी आमदार शेळकेंकडून पूर्ण! 60 लाख निधीतून बांधणार नवा साकव पूल । Maval News
– स्व. पै. केशवराव ढोरे प्रतिष्ठान सामुदायिक विवाह सोहळा समितीची कार्यकारिणी जाहीर; 1 मे रोजी होणार विवाह सोहळा । Vadgaon Maval