लोणावळा येथील जगविख्यात कैवल्यधाम योग संस्थेमध्ये 10 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस शुक्रवारी (दिनांक 21 जून) मोठ्या उत्साहात साजरा केला. संस्थेच्या माध्यमातून तालुक्यातील वेगवेगळ्या संस्था, शाळा तसेच महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सहकार्याने विविध पर्यटनस्थळ आदी ठिकाणी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
कैवल्यधाम योग संस्थेमध्ये योग दिवसाची सुरुवात शांती पाठाने करण्यात आली. तदनंतर प्रमुख पाहुणे बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा चे अध्यक्ष, वकील राजेंद्र उमप, कैवल्यधाम योग महाविद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बंदिता सतपते, ब्रिगेडियर (निवृत्त) सुहास धर्माधिकारी यांच्या शुभ हस्ते दिप प्रज्वलन करण्यात आले. सकाळी 8.45 ते 9.30 वाजेपर्यंत योगा प्रोटोकॉल प्रमाणे कैवल्यधाम संस्थेच्या योगाचार्या श्रीमती संध्या दीक्षित यांनी योग प्रशिक्षण घेतले. ( 10th International Yoga Day Celebrated By Kaivalyadham Yoga Sanstha Lonavla )
याशिवाय आंतरराष्ट्रीय योग दिवसाचे औचित्य साधून मावळ तालुक्यातील कार्ला लेणी व भाजे लेणी, एमटीडीसी कार्ला, देहूरोड कैनटोनमेंट, लोणावळ्यातील एल अँड टी प्रशिक्षण केंद्र, आयएनएस शिवाजी येथे कैवल्यधाम संस्थेतर्फे योग प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. भाजे लेणी येथे संपर्क बालग्राम, भाजे येतील विद्यार्थी सहभागी झाले होते. तसेच कैवल्य विद्या निकेतन शाळा, कैवल्यधाम यांनी लोणावळ्यातील विविध शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी योग प्रशिक्षण वर्गाचे विशेष आयोजन केले होते.
दहावा आंतरराष्ट्रीय योग दिवस यशस्वीरीत्या साजरा करण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तसेच लोणावळ्यातील वकील संजय गायकवाड यांचे विशेष सहकार्य लाभले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे सूत्र संचालन योग प्रशिक्षिका कुमारी ममता बिष्ट यांनी केले आणि आभार प्रदर्शन वकील संजय गायकवाड यांनी केले. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या कार्यक्रमाचे आयोजन कैवल्यधाम संस्थेचे मानद सचिव आणि प्रमुख कार्यकारी अधिकारी सुबोध तिवारी यांनी केले होते.
अधिक वाचा –
– ‘ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही’, सरकारच्या आश्वासनानंतर हाकेंचे उपोषण स्थगित ; मनोज जरांगेंचा सरकारला इशारा
– मळवंडी ठुले येथे वनविभागाची मोठी कारवाई ! संरक्षित वन्यप्राण्याची शिकार केल्याप्रकरणी 4 शिकारी अटकेत, 1 फरार
– कान्हे येथे मावळमधील विणेकऱ्यांचा सन्मान ; ‘वारकऱ्यांना सन्मानित करण्याची सेवा आमदार सुनिल शेळके दरवर्षी करतात हे कौतुकास्पद’