बारावी बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. सालाबाद प्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली असून सर्व विभागांत कोकण विभाग पुन्हा एकदा अव्वल ठरले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
बारावीच्या निकालाची ठळक वैशिष्टये – ( HSC Exam2024 )
१. या परीक्षेस राज्यातील पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमधून विज्ञान, कला, वाणिज्य व व्यवसाय अभ्यासक्रम व आय.टी.आय. या शाखांसाठी एकूण १४,३३,३७१ नियमित विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी १४,२३,९७० विद्यार्थी प्रविष्ट झाले असून त्यापैकी १३,२९,६८४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व निकालाची टक्केवारी ९३.३७ आहे.
२. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ४५,४४८ पुनर्परिक्षार्थी विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ४५,०८३ विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी २२,४६३ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ४९.८२ आहे.
३. खाजगी विद्यार्थी म्हणून नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या ४१,३६२ एवढी असून त्यापैकी ४०,७९५ विद्यार्थी प्रविष्ट झाले असून ३४,९८८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यांच्या निकालाची टक्केवारी ८५.७६ आहे.
४. या परीक्षेस राज्यातील नऊ विभागीय मंडळांमधून सर्व शाखांमधून एकूण ७०३२ दिव्यांग विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६९८६ दिव्यांग विद्यार्थी परीक्षेस प्रविष्ट झाले. त्यापैकी ६५८१ दिव्यांग विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत व त्यांची एकूण निकालाची टक्केवारी ९४.२० आहे.
५. इ.१२ वी परीक्षेस नोंदणी केलेल्या पात्र दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रचलित पध्दतीने सवलतीचे गुण देणेबाबत कार्यवाही करण्यात आलेली आहे.
६. सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थ्यांचा कोकण विभागाचा निकाल (९७.५१ %) सर्वाधिक असून सर्वात कमी निकाल मुंबई विभागाचा (९१.९५ %) आहे.
सर्व विभागीय मंडळातून नियमित मुलींचा निकाल ९५.४४ % असून मुलांचा निकाल ९१.६० % आहे. म्हणजेच मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा ३.८४ % ने जास्त आहे.
विभागनिहाय निकाल –
पुणे: ९४.४४, नागपूर ९२.१२, छत्रपती संभाजीनगर ९४.०८, मुंबई ९१.९५, कोल्हापूर ९४.२४, अमरावती ९३.००, नाशिक ९४.७१, लातूर ९२.३६, कोकण ९७.५१
दरम्यान, महाराष्ट्र राज्य मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२४ मध्ये घेतलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता १२ वी) परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना दुपारी १ वाजता बोर्डाच्या अधिकृत संकेतस्थळांवर पाहता येईल.
अधिक वाचा –
– पिंपरी-चिंचवड शहर फुल मार्केट असोसिएशनच्या अध्यक्षपदी संजीवकुमार बोडके यांची निवड । Sanjeev Kumar Bodake
– अवकाळी पावसात हायमास्ट दिव्यांची पडझड, वडगाव राष्ट्रवादीचे नगरपंचायत प्रशासनाला निवेदन । Vadgaon Maval
– मोठी बातमी ! इराणचे अध्यक्ष इब्राहीम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू, संपूर्ण देशावर शोककळा । Iran President Ebrahim Raisi Helicopter Crash