संसदेत 18 व्या लोकसभेची स्थापना झाली आहे. महाराष्ट्रातील 48 लोकसभा मतदारसंघातून 48 खासदार निवडून लोकसभेत गेले आहेत. आज, मंगळवारी (दि. 25 जून) सर्व नवनिर्वाचित खासदारांना संसदेच्या सदस्यत्वाची शपथ देण्यात आली. यावेळी केंद्रीय मंत्री बनलेले खासदारांसह महाराष्ट्रातील 48 खासदार देखील शपथबद्ध झाले. परंतु शपथ घेण्याचा हा सोहळा अत्यंत खास ठरला. कारण महाराष्ट्रातील सर्व खासदारांनी मराठी भाषेत शपथ न घेता काहींनी हिंदी, इंग्रजीचाही पर्याय स्विकारला. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
महाराष्ट्रातील 48 खासदारांपैकी 36 खासदारांनी माय मराठी भाषेत संसदेच्या सदस्यत्वाची शपथ घेतली. तर एकूण 9 खासदारांनी हिंदी भाषेत आपल्या खासदारकीची शपथ घेतली. तर, उर्वरित 3 खासदारांनी इंग्रजी भाषेत शपथ घेतली. खास बाब म्हणजे आजच्या सर्व शपथांमध्ये खासदार निलेश लंके यांनी घेतलेल्या इंग्रजीतील शपथेचे भारी चर्चा झाली. महाराष्ट्रातील कोणत्या खासदाराने कोणत्या भाषेत शपथ घेतली, हे पाहण्यासाठी खालील यादी वाचा. ( 18th Lok Sabha 48 MPs from Maharashtra Oath in Marathi Hindi English language See full list )
काँग्रेस (आय) पार्टी
शोभा बच्छाव, धुळे – मराठी
बळवंत वानखेडे, अमरावती – मराठी
प्रतिभा धानोरकर, चंद्रपूर – मराठी
कल्याण काळे, जालना – मराठी
वसंत चव्हाण, नांदेड – मराठी
वर्षा गायकवाड, मुंबई उत्तर मध्य – मराठी
शिवाजी कालगे, लातूर – मराठी
छत्रपती शाहू महाराज, कोल्हापूर – मराठी
प्रणिती शिंदे, सोलापूर – हिंदी
गोवाल पाडवी, नंदूरबार – हिंदी
श्यामकुमार बर्वे, रामटेक – हिंदी
प्रशांत पडोले, भंडारा-गोंदिया – हिंदी
किरसान नामदेव, गडचिरोली-चिमूर – इंग्रजी
भारतीय जनता पार्टी
छत्रपती उदयनराजे भोसले, सातारा – मराठी
मुरलीधर मोहोळ, पुणे – मराठी
रक्षा खडसे, रावेर – मराठी
स्मिता वाघ, जळगाव – मराठी
नारायण राणे, रत्नागिरी-सिंधुदुर्ग – हिंदी
अनुप धोत्रे, अकोला – हिंदी
पीयूष गोयल, उत्तर मुंबई – हिंदी
नितीन गडकरी, नागपूर – हिंदी
हेमंत सावरा, पालघर – इंग्रजी
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
संजय देशमुख, यवतमाळ वाशिम – मराठी
नागेश पाटील आष्टीकर, हिंगोली – मराठी
संजय जाधव, परभणी – मराठी
राजाभाऊ वाजे, नाशिक – मराठी
संजय दिना पाटील, ईशान्य मुंबई – मराठी
अनिल देसाई, दक्षिण मध्य मुंबई – मराठी
अरविंद सावंत, दक्षिण मुंबई – मराठी
भाऊसाहेब वाकचौरे, शिर्डी – मराठी
ओमराजे निंबाळकर, धाराशिव – मराठी
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
अमर काळे, वर्धा – मराठी
भास्कर भगरे, दिंडोरी – मराठी
सुरेश म्हात्रे (बाळ्या मामा), भिवंडी – मराठी
बजरंग सोनावणे, बीड – मराठी
सुप्रिया सुळे, बारामती – मराठी
अमोल कोल्हे, शिरूर – मराठी
ध्यैर्यशील मोहिते पाटील, माढा – मराठी
निलेश लंके, अहमदनगर – इंग्रजी
शिवसेना (एकनाथ शिंदे गट)
प्रतापराव जाधव, बुलढाणा – मराठी
संदीपान भुमरे, छत्रपती संभाजीनगर – मराठी
श्रीकांत शिंदे, कल्याण – मराठी
नरेश म्हस्के, ठाणे – मराठी
रवींद्र वायकर, मुंबई उत्तर पश्चिम – मराठी
श्रीरंग बारणे, मावळ – मराठी
धैर्यशील माने, हातकणंगले – मराठी
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट)
सुनील तटकरे, रायगड – मराठी
अपक्ष खासदार (काँग्रेस समर्थन)
विशाल पाटील, सांगली – हिंदी
अधिक वाचा –
– कार्ला ग्रामपंचायतीच्या सरपंच दिपाली हुलावळे यांना राज्यस्तरीय नालंदा ग्रामसमृद्धी पुरस्कार । Karla News
– 14 वर्षानंतर पुन्हा भरली शाळा ! पवना विद्या मंदिर शाळेत 2009 वर्षातील माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा संपन्न
– मावळ तालुक्यातील 5 हजार वारकरी बंधु-भगिनींना पोशाख देऊन आमदार सुनिल शेळकेंनी व्यक्त केली कृतज्ञता । MLA Sunil Shelke