1 ऑक्टोबर हा जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा केला जातो. जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाचे औचित्य साधून वडगाव मावळ शहरातील अनेक ज्येष्ठ नागरिकांचा माजी उपनगराध्यक्षा सायली म्हाळसकर आणि मनसे तालुकाध्यक्ष रुपेश म्हाळसकर यांच्या वतीने मावळगड कार्यालय इथे सन्मान करण्यात आला. यावेळी सर्व ज्येष्ठ नागरिकांचे औक्षण करून त्यांच्या हस्ते केक कापण्यात आला. तसेच शॉल, श्रीफळ आणि गुलाब पुष्प देऊन प्रत्येक ज्येष्टाचा सन्मान करण्यात आला. यानंतर ज्येष्ठ नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रश्नांवर सखोल चर्चा करण्यात आली. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
‘ज्येष्ठ नागरिकांचे मार्गदर्शन आणि अनुभव हे नेहमीच गावच्या व भावी पिढीच्या भवितव्यासाठी दिशादर्शक ठरत असतात. त्यांच्या याच अनुभवाच्या शिदोरीवर वडगाव शहर हे भविष्यात प्रगतीकडे वाटचाल करेल यात, तीळ मात्र शंका नाही’ असे सायली म्हाळसकर यांनी यावेळी सांगितले. जेष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष सुरेश कुडे, उपाध्यक्ष नितीन भांबळ, मारुती चव्हाण, विवेक गुरव, मनोहर बागेवाडी, प्रकाश ढोरे, ज्ञानेश्वर सोनवणे, चंद्रकांत ठोंबरे, नथुराम जाधव, पंडित ढोरे, बाळकृष्ण ढोरे, लक्ष्मण ढोरे, दत्तात्रय घोलप, चंद्रकांत राऊत, शांताराम कुडे आदी यावेळी उपस्थित होते. ( 1st October World Senior Citizens Day Honoring Senior Citizens at Vadgaon Maval )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– करुंज ग्रुप ग्रामपंचायतीमधील 25 आदिवासी (कातकरी) बांधवांना जात प्रमाणपत्राचे वाटप
– 2 ऑक्टोबर, महात्मा गांधी जयंती विशेष : “महात्मा गांधीजी आणि तळेगाव दाभाडे शहर यांच्यातील आठवणींना उजाळा
– Breaking! द्रुतगती मार्गावर पुणे लेनवर अपघात, अज्ञात वाहनाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू