Dainik Maval News : पुणे जिल्हा परिषद शिक्षण विभागातील 20 शिक्षकांना विस्तार अधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली आहे. जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी याबाबत जिल्ह्यातील संबंधित पंचायत समित्यांच्या गटविकासअधिकारी आणि गटशिक्षणाधिकारी यांना लेखी आदेश जारी केले आहेत.
या निर्णयामुळे मागील काही वर्षांपासून सुरू असलेल्या शिक्षक संघाच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळाले आहे. मावळ तालुक्यातील आदर्श मुख्याध्यापक संदीप काळे यांचीही या पदावर नियुक्ती झाली आहे.
पुणे जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने शिक्षकांच्या पदोन्नतीची मागणी केली होती. त्यानुसार विस्तार अधिकारी पदोन्नतीच्या रिक्त जागांवर नियुक्त्या करण्यात आल्याचे संघाचे राज्य अध्यक्ष केशवराज जाधव, जिल्हाध्यक्ष नारायण कांबळे यांनी सांगितले.
पदोन्नतीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत खरात, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे, उपशिक्षणाधिकारी संजय काळे, तसेच कक्ष अधिकारी राजेश खंदारे, शिल्पा रासकर, अनिल रंधावे, संध्या केदारी यांचे योगदान महत्त्वाचे असल्याचे शिक्षक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
शिक्षण विस्तार अधिकारी पदोन्नती प्रक्रिया राबविल्याबद्दल संघटनेच्या वतीने प्रातिनिधिक स्वरूपात मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, शिक्षणाधिकारी संजय नाईकडे यांचे आभार मानण्यात आले.
उच्च न्यायालयाने याबाबत दाखल याचिकेची सुनावणी पूर्ण झाल्यानंतर दिलेल्या आदेशातील अंतिम निर्णयानुसार सामान्य प्रशासन विभागाने 7 मे 2021 च्या शासन निर्णयातील पदोन्नती बाबतच्या मार्गदर्शक तरतुदींच्या अधीन राहून शिक्षक मुख्याध्यापकांना विस्तार अधिकारी पदावर नियुक्त्या केल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या आदेशात म्हटले आहे.
( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
अधिक वाचा –
– महत्वाची बातमी : आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या अनुषंगाने पुणे जिल्ह्यातील वाहतूक मार्गात मोठे बदल – लगेच चेक करा
– धोकादायक पर्यटनस्थळे तात्पुरती बंद ठेवा, पर्यटकांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या ; राज्याच्या मुख्य सचिवांचे निर्देश
– PHOTO : विठ्ठलाच्या भेटीला जगद्गुरू निघाले… देहूनगरीतून तुकोबारायांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान; पहिला मुक्काम इनामदार वाड्यात
– तळेगाव दाभाडेपासून उरुळीकांचनपर्यंत नवीन लोहमार्ग केला जाणार ; उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती । DCM Ajit Pawar