मोरया प्रतिष्ठान मार्फत वडगाव मावळ शहरातील लहान मुलांसाठी सफर गड दुर्गांची हा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाअंतर्गत स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचा जीवनप्रवास मुलांना प्रत्यक्ष गडकोटांची सफर करून समजून सांगितला जात आहे. दर महिन्यातील एका रविवारी एक किल्ला असा हा उपक्रम राबवला जात आहे. सर्वात आधी किल्ले शिवनेरी येथून उपक्रमाची सुरुवात झाली. त्यानंतर किल्ले रायरेश्वर आणि आता किल्ले तोरणा इथे मुलांना नेण्यात आले. शहरातील एकूण 300 मुलांना प्रतिष्ठानने तोरणा किल्ल्याची सफर घडवली. ( मावळ, पिंपरी-चिंचवड, पुणे परिसरातील ताज्या अपडेट्ससाठी दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप चॅनेल जॉईन करा )
रविवारी (दि. 11) रोजी पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्यातील तोरणा उर्फ प्रचंडगड किल्ल्यावर सफर गड दुर्गांची उपक्रमाअंतर्गत तिसरी गडमोहिम आयोजित करण्यात आली होती. शिवरायांचे जन्मस्थान किल्ले शिवनेरी, स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वराचे ठिकाण आणि त्यानंतर आता शिवरायांची जिंकलेला पहिला किल्ला म्हणजेच किल्ले तोरणा येथे मुलांना नेण्यात आले. मागील दोन मोहिमांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांपेक्षा यावेळी सहभागी विद्यार्थी संख्या अधिक होती. (300 children from Vadgaon Maval made a trip to Torna Fort Through Morya Pratishthan)
वडगाव नगरीचे माजी नगराध्यक्ष मयूर ढोरे व मोरया महिला प्रतिष्ठानच्या अध्यक्षा अबोली ढोरे यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम पार पडत आहे. प्रतिष्ठानने रविवारी तोरणा किल्ल्यावर नेलेल्या मुलांमध्ये चौथी ते नववीपर्यंतचे मुलं-मुली सहभागी झाले होते. त्यांच्यासाठी बसची व्यवस्था करण्यात आली होती. तसेच मेडिकल किट व वैद्यकीय अधिकारीही सोबत होते. मोहिमेत मुलांना गडावरील वास्तूंची माहिती देण्यात आली आणि गडाचा इतिहास सांगण्यात आला. सर्व मुलांनी दिवसभर सहलीचा आनंद घेतला. पराग ढोरे, मकरंद ढोरे, सिद्धेश ढोरे यांचे यामध्ये मोलाचे सहकार्य लाभले.
“मोरया प्रतिष्ठानच्या माध्यमातून इथून पुढेही शिवरायांच्या गडदुर्ग अभ्यासाच्या मोहिमा अशाच अविरतपणे सुरू राहतील. अशा सहलींमुळे मुलांचा शारीरिक कस पणाला लागेल. त्यातून आपली भावी पिढी तंदुरुस्त होईल आणि त्यांचा आत्मविश्वासही वाढेल.” मयूर ढोरे आणि अबोली ढोरे
अधिक वाचा –
– मोठी बातमी! राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाचे 6 गावांमध्ये छापे; 995 लीटर गावठी दारूसह 7 लाखांचा मुद्देमाल जप्त । Pune News
– Breaking! पुन्हा ब्लॉक..! मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरून प्रवास करणार असाल तर आधी ही बातमी वाचा । Block On Mumbai Pune Expressway
– शिवस्मारकाची उभारणी ते सार्वजनिक सभागृह, जीम-योगा सेंटर; कान्हे ग्रामपंचायतमधील विविध कामांचे आमदार सुनिल शेळकेंच्या हस्ते भूमिपूजन