“महाराष्ट्राला प्राचीन मंदिरे, लेणी यांचा वारसा लाभलेला आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांनी विधानमंडळाच्या सन 2020 रोजीच्या हिवाळी अधिवेशनात आभाराच्या भाषणात केलेल्या घोषणेनुसार आणि दिनांक 23 डिसेंबर 2020 रोजी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत महाविकासआघाडी सरकारने प्राचीन मंदिरे, लेण्या संवर्धन करण्याबाबत बृहत विकास आराखडा तयार करण्याचे आदेश दिले होते.”
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
“दिनांक 30 डिसेंबर 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महाराष्ट्रातील आठ प्राचीन मंदिरांचे जतन, संवर्धन आणि परिसर विकास करण्यास मान्यता देण्यात आली होती. त्यामध्ये महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आगरी-कोळी बांधवांचे कुलदैवत, मावळ तालुक्यातील ( Maval Taluka ) कार्ला (Karla ) येथील आई एकवीरा देवी मंदिराचा ( Ekvira Devi Temple ) प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.”
“सन 2021-22 च्या अर्थसंकल्पात सुमारे 101 कोटी रुपयाची तरतुद करण्यात आली होती. त्यांपैकी भाविकांचे श्रद्धास्थान आई एकविरा देवी मंदिर आणि लेणी जतन, संवर्धन व परिसर विकास करण्यासाठी सुमारे 39 कोटी 43 लक्ष रुपये इतक्या अंदाजित खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.”
आगामी काळात रोप वे, भक्त निवास व आवश्यकतेनुसार भौतिक सोयी सुविधांसाठी सरकारकडे पाठपुरावा करुन ती कामे लवकरात लवकर पुर्ण करण्यास मी कटिबद्ध असेल, असे आमदार सुनिल शेळके ( MLA Sunil Shelke ) यांनी सांगितले आहे. ( 39 crore 43 lakhs sanctioned for development and conservation of Ekvira Devi temple and cave premises at Karla )
अधिक वाचा –
लम्फी स्कीन : वेहेरगाव दहिवली ग्रुप ग्रामपंचायतीकडून पशूधनाचे मोफत लसीकरण
भाऊ हे कधी झालं? पवनमावळमधल्या जवण ते तुंग मार्गावर अनेक गावांचे विनामागणी नामांतर; नागरिकांना फुकटचा मनस्ताप