सर्वांनाच आता पालखी सोहळा आणि वारी सुरू होण्याची आस लागली आहे. वारीतला पायी प्रवास हा परमात्मा पांडुरंगाच्या भेटीनंतर पूर्ण होतो आणि विठूरायाच्या भेटीने चालण्याचा सर्व शीण निघून जातो. मावळ तालुक्यातील 4 तरूणांनी मात्र पायी वारी सुरू होण्या अगोदरच आगळ्यावेगळ्या पद्धतीने सायकल वारी पूर्ण केली आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळ तालुक्यातील कांब्रे आणि तळेगाव येथील 4 तरूणांनी मावळ ते पंढरपूर अशी तब्बल 544 किलोमीटरची सायकल वारी पूर्ण करून समाजापुढे आरोग्याचा नवा आदर्श ठेवला आहे. मावळ एथलिट असोसिएशनने या सायकल वारीचे आयोजन केले होते. कांब्रे गावातील विठ्ठल गायकवाड, गणेश गायकवाड तर तळेगाव दाभाडे येथून सूरज जाठ, किशोर पाटील हे 4 तरूण मावळ तालुक्यातून आणि पाचवा नितीन शिरसट हा पुण्यातून त्यांच्यासोबत जोडला गेला. पाचही युवकांनी शनिवार, रविवार अशा दोन दिवसात तब्बल 544 किलोमीटर अंतर सायकलवर पूर्ण करत पंढरपूर वारी पूर्ण केली. ( 4 youth completed Maval to Pandharpur cycle wari )
फक्त दोन दिवसात सायकलवर हा प्रवास पूर्ण करत पांडुरंगाचे दर्शन घेऊन सायकस्वार सुखरूप माघारी परतले आहेत. ज्याप्रमाणे लाखो वारकरी दरवर्षी वारीतून विठ्ठल भेटीसाठी पंढरपूरला जातात, त्याप्रमाणे हे तरूण सायकल वारी करत पंढरपूरी जाऊन आले. त्यांच्या सायकल वारीचे यंदा तिसरे वर्ष होते. विठ्ठल नामाचे चिंतन करत विठूरायाच्या ओढीने प्रवास केल्याने आमचा प्रवास सुखकर झाल्याचे सायकलपटूंनी सांगितले. तसेच पांडुरंगाच्या दर्शनासोबत नागरिकांना निरोगी आरोग्याचा मंत्र देण्याचा आमचा प्रयत्न होता, सायकल चालवल्याने आरोग्य निरोगी राहते व स्नायू मजबूत होतात, असा संदेश त्यांनी दिला.
अधिक वाचा –
– माशाच्या जाळ्यात अडकलेल्या भल्या मोठ्या अजगराची सर्पमित्रांकडून सुटका । Khopoli News
– भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News
– मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha