व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Sunday, September 20, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

इंद्रायणी नदीची दुरावस्था दूर करा ! लोणावळा शहर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नगरपरिषदेला निवेदन । Lonavala News

सांस्कृतिक व भक्तीभाव जोपासणारी इंद्रायणी नदी आजमितीस प्रदूषणाच्या विळख्यात जखडलेली दिसून येत आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
June 16, 2024
in मावळकट्टा, ग्रामीण, लोकल, शहर
lonavala NCP Sharad Pawar group

Photo Courtesy : Team Dainik Maval


Lonavala News : लोणावळा शहर हद्दीत इंद्रायणी नदीची मोठ्या प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन नदीची दुरवस्था दूर करावी, अशा मागणीचे निवेदन लोणावळा शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या वतीने पालिकेला देण्यात आले आहे. सांस्कृतिक व भक्तीभाव जोपासणारी इंद्रायणी नदी आजमितीस प्रदूषणाच्या विळख्यात जखडलेली दिसून येत आहे. नदी पात्रालगत असणारे नागरी वस्त्यांमधील मैलामिश्रीत पाणी या पात्रात सोडण्यात आलेले आहे. त्यामुळे नदीचे पावित्र्य भंग झाले आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर )

आधुनिक – विकसित तंत्रज्ञानाचा वापर करुन सदरचे मैलामिश्रीत पाण्यावर प्रक्रिया करणे शक्य आहे. त्याचप्रमाणे वितरण नलिका टाकून नगरपरिषदेच्या डोंगरगाव येथील मैलाशुध्दीकरण केंद्र या ठिकाणी सदरचे मैला मिश्रीतपाणी संकलित करुन प्रक्रिया करणे शक्य आहे. महाराष्ट्र शासनाकडून तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून वेळोवेळी इंद्रायणी नदी पात्र स्वच्छतेबाबत दिशानिर्देश झाले असताना देखील नगरपरिषदेकडून वरील प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित केला जात नाही, असा आरोप करण्यात आला आहे. ( NCP Sharad Pawar group Letter to Lonavla Nagar Parishad regarding cleaning of Indrayani river )

नगरपरिषदेने नदी स्वच्छतेच्या कामाला प्राथमिकता देऊन किमान आगामी सार्वजनिक गणेशोत्सवापूर्वी लोणावळा नगरपरिषद हद्दीमधील इंद्रायणी नदी पात्रात नागरी वस्तीचे मैलामिश्रीत पाणी येणार नाही, याकरिता ठोस उपाय योजना कराव्यात आणि नागरीकांच्या धार्मीक भावना जपाव्यात अशी विनंती राष्ट्रवादी कडून करण्यात आली आहे. लोणावळा नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी शरद कुलकर्णी यांनी वरील निवेदन स्वीकारले. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष, प्रांतिक सदस्य, प्रदेश उपाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

अधिक वाचा –
– भारत हा जगातील सर्वात जास्त मांजर पालन करणारा देश – साकीब पठाण । Khopoli News
– मावळ मतदारसंघातील विजयात महायुतीचे कार्यकर्ते आणि शिवसैनिकांचा मोठा वाटा – खासदार श्रीरंग बारणे । Maval Lok Sabha
– महिलांना रोजगार आणि आर्थिक लाभासाठी बचत गटांकडून शाळेचे गणवेश शिलाई करून घेण्याचा निर्णय


dainik maval jahirat

Previous Post

पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून मावळात खरीप हंगामासाठी 45 कोटी 66 लाखांचे कर्ज वाटप – माऊली दाभाडे

Next Post

मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Pandharpur cycle wari

मावळच्या 4 तरूणांनी सायकलवरून केली पंढरपूरची वारी, दोन दिवसात 544 किलोमीटर अंतर पूर्ण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Lord Ganesha bid farewell amidst devotional atmosphere in Pawananagar maval area

पुढच्या वर्षी लवकर या… पवनानगर परिसरात दीड दिवसांच्या गणरायाला भक्तिमय वातावरणात निरोप

September 16, 2026
Takve Budruk maval Child Sexual Abuse Case Trupti Desai Demands Fast-Track Trial

टाकवे बुद्रुक बाललैंगिक अत्याचार प्रकरण : खटला ‘फास्टट्रॅक’वर चालवून आरोपीला कठोर शिक्षेची तृप्ती देसाईंची मागणी

September 16, 2026
Former Minister of State Madan Bafna passes away Funeral held with state honors

‘मावळचे भाग्यविधाते’ माजी मंत्री मदन बाफना यांना शासकीय इतमामात अखेरचा निरोप

September 16, 2026
Maval Purchase and Sale Union Shetkari Bhavan to be named after Ajit Dada Pawar

मावळ खरेदी विक्री संघाच्या ‘शेतकरी भवन’ला अजितदादांचे नाव देणार! संचालक गणेश विनोदे यांच्या प्रस्तावाला सर्वानुमते मंजुरी

September 9, 2026
Bicycles distributed to 55 students from five schools in Maval Taluka

विद्यार्थ्यांची पायपीट अखेर थांबली ! मावळ तालुक्यातील ५ शाळांतील ५५ विद्यार्थ्यांना सायकलींचे वाटप

September 9, 2026
NCP strengthens organizational structure in Maval rural areas

मावळ ग्रामीण भागात राष्ट्रवादी काँग्रेसकडून संघटनात्मक बांधणी ; नवीन पदाधिकारी नियुक्त्या जाहीर

September 7, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.