आर्टिफिशियल इंटेलिजन्स टेक्नॉलॉजी अर्थात एआय (AI) तंत्रज्ञान वापरून कर्करोग झालेल्या रुग्णाचा रेडिओलॉजिस्टच्या मदतीने कर्करोग बरा करण्यात आला आहे. तळेगाव दाभाडे येथे ही राज्यातील पहिलीच यशस्वी शस्त्रक्रीया पार पडल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात आले. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअॅप चॅनेलवर )
मावळातील एका सत्तर वर्षीय ज्येष्ठ नागरिकाला फुप्फुसाचा कॅन्सर झाला होता. त्यांच्या घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. त्यामुळे त्यांनी तळेगाव दाभाडे येथील कॅन्सर हॉस्पिटलमध्ये उपचार घेण्यास सुरुवात केली. प्रथमदर्शनी रुग्णाला फुफुसाचा कॅन्सर झाल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर डॉक्टरांनी रुग्णाला रेडिएशनच्या मार्फत कॅन्सरची गाठ काढण्याचे सांगितले. त्यानुसार डॉक्टरांनी फुफ्फुसातील रुग्णाची कॅन्सरची गाठ एआय टेक्नॉलॉजी मार्फत काढली. ( 70 year old men cured of cancer in maval through AI technology first successful surgery at talegaon )
या उपचार प्रक्रियेत साधारणतः एक ते दोन महिन्याचा कालावधी गेला. त्यानंतर आता हे सत्तर वर्षीय आजोबा ठणठणीत बरे झाल्याचे पाहायला मिळत आहे. एआय टेक्नॉलॉजीमुळे नोकऱ्या धोक्यात येतील, असा समज एकीकडे नागरिकांमध्ये पसरत असताना दुसरीकडे मात्र याच AI तंत्रज्ञानाचा मेडिकल क्षेत्रात चांगला उपयोग होताना दिसत आहे. तळेगाव येथे हे उपचाय यशस्वी झाल्याने कॅन्सर रुग्णालयातील डॉक्टरांचे सर्वत्र कौतुक होत आहेत. कारण एआय टेक्नॉलॉजी वापरून कॅन्सर बरा करण्याची महाराष्ट्रातील पहिलीच घटना आहे.
एआय तंत्रज्ञान –
जगात सतत नवनवीन तंत्रज्ञानाचा अविष्कार होत असतो. आताही एआय तंत्रज्ञानाचा सगळीकडे बोलबाला होत आहे. AI हे तंत्रज्ञान वापरून अनेक अशक्य गोष्टी शक्य केल्या जाताना दिसतात.
अधिक वाचा –
– ‘लोकसभेच्या मतदानाचा सकारात्मक विचार करून विधानसभेच्या तयारीला लागूया’, पनवेल येथे खासदार बारणेंचा जंगी सत्कार
– मावळ तालुक्यातील काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या फुलाबाई काळे यांचे निधन । Talegaon Dabhade
– मावळ प्रबोधिनी संस्थेच्या माध्यमातून नवलाख उंब्रे येथील श्रीराम मंदिराजवळ वृक्षारोपण । Maval News