स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्षाचा सांगता सोहळा 9 ऑगस्टपासून सर्व देशभर सुरू झाला असून प्रत्येक पुणेकराने ‘घरोघरी तिरंगा’ उपक्रमांतर्गत आपल्या घरी 13 ते 15 ऑगस्ट या कालावधीत राष्ट्रध्वज उभारुन मानवंदना द्यावी, असे आवाहन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. पुणे महापालिकेकडून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रध्वज सुपूर्द करुन शहरात राष्ट्रध्वज वाटप उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी महापालिकेच्या कोथरुड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाचे सहायक आयुक्त केदार वझे, आरोग्य निरीक्षक गणेश साठे तसेच संदीप खर्डेकर, महापालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
राज्यात ध्वजारोहण किती वाजता?
भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवअंतर्गत स्वातंत्र्याचा 76 वा वर्धापन दिन मंगळवार 15 ऑगस्ट रोजी साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने राज्यपाल रमेश बैस यांच्या हस्ते विधान भवन (कौन्सिल हॉल) येथे सकाळी 9.०5 वा. ध्वजारोहणाचा मुख्य शासकीय कार्यक्रम होणार आहे. नागरिकांना मुख्य शासकीय समारंभात भाग घेता यावा यासाठी सकाळी 8.35 ते 9.35 वा. च्या दरम्यान ध्वजारोहणाचा अथवा इतर कोणताही शासकीय व निमशासकीय समारंभ आयोजित करण्यात येऊ नये. अन्य कार्यालयांना सकाळी 8.35 पूर्वी किंवा 9.35 नंतर ध्वजारोहण कार्यक्रम साजरा करता येईल.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने पुणे जिल्हाधिकारी कार्यालय येथे सकाळी 7.30 वाजता आणि शनिवार वाडा येथे सकाळी 8 वा. ध्वजारोहण कार्यक्रम होणार आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांनी कळविले आहे. ( 76th Independence Day of India Har Ghar Tiranga Abhiyan this year too )
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– ‘लोणावळा वुमन्स फाउंडेशन’च्या वतीने ‘स्वतंत्र महिला’ कार्यक्रमाचे आयोजन; IPS सत्यसाई कार्तिक यांच्याकडून मार्गदर्शन
– देहूरोड कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीतील विविध समस्या आणि नागरिकांच्या तक्रारीबाबत आमदार शेळकेंनी घेतली अध्यक्षांची भेट
– शाब्बास पोरांनो..! पवना शिक्षण संकुलातील विद्यार्थ्यांचे नाट्यछटा स्पर्धेत घवघवीत यश, आता थेट जिल्हा पातळीवर भिडणार