व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video
Saturday, March 14, 2026
  • Login
Dainik Maval
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ
No Result
View All Result
Dainik Maval
No Result
View All Result

महत्वाचे ! पवना धरण 77 टक्के भरले, धरणातून 1400 क्युसेक विसर्ग सुरू, नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा । Pavana Dam

पवन मावळ विभागात गेले तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच आहे.

Team Dainik Maval by Team Dainik Maval
July 25, 2024
in पुणे, ग्रामीण, ग्रामीण, मावळकट्टा, लोकल
Pavana Dam

Photo Courtesy : Team Dainik Maval


Dainik Maval News : पवन मावळ विभागात गेले तीन दिवसांपासून पावसाचा जोर कायम आहे. पवना धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस सुरूच असून गुरूवारी (दि. 25 जुलै) रात्री 10 वाजता घेतलेल्या नोंदीनुसार पवना धरणात 77.54 टक्के पाणीसाठा जमा झाला आहे. तसेच सायंकाळी चार वाजल्यापासून पवना धरणातील विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग सुरू करण्यात आला आहे. ( मावळ तालुक्यातील प्रत्येक घडामोडीची अपडेट मिळवा दैनिक मावळच्या व्हॉट्सअ‍ॅप चॅनेलवर ) 

पवना धरणातील पाणीसाठ्यात झालेली भरभक्कम वाढ यामुळे मावळवासियांसह पिंपरी-चिंचवड शहर वासियांचा वर्षभराचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. असे असले तरीही पवन मावळसह मावळ तालुक्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहत असून नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. आधीच मुसळधार पावसामुळे जलमय झालेले पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांना आता पवनेतील वाढणाऱ्या पाण्यामुळे अधिक सतर्क राहावे लागणार आहे. ( 77 percent water storage in Pavana Dam water release of 1400 cusecs started from  )

पवना धरणात 77.54 टक्के पाणीसाठा
गुरूवारी रात्री 10 वाजता धरण विभागाने घेतलेल्या नोदीनुसार, धरणात 77.54 टक्के पाणीसाठा आहे. तसेच मागील 24 तासात धरण परिसरात 141 मीमी इतका पाऊस झाला आहे. तसेच या हंगामात अर्थात 1 जून पासून आतापर्यंत एकूण 1737 मीमी पाऊस झाला आहे. तसेच धरणातील पाण्याची आवक वेगाने होत असल्याने पवना धरणातून सायंकाळी 4 वाजल्या पासून विद्युतगृहाद्वारे 1400 क्युसेक विसर्ग करण्यात येत असल्याची माहिती धरण प्रशासनाच्या वतीने देण्यात आली.

पवना नदीकाठच्या नागरिकांना इशारा –
पवना धरण पाणलोट क्षेत्रात वाढत्या पावसामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग केला जात आहे. तो पावसाचे आणि पाण्याचे प्रमाण वाढल्यास वाढू शकतो. त्यामुळे पवना नदीकाठच्या नागरिकांनी सतर्कता बाळगावी, पवना धरणाच्या खालील बाजुस नदीकाठच्या सर्व गावातील नागरिकांनी दक्ष राहून नदी तीरावरील जनावरे, माेटारी, अवजारे व इतर सामग्री त्वरीत सुरक्षित ठिकाणी हलवावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

अधिक वाचा –
– राज्यात आर्मी, नेव्हीच्या तुकड्या देखील सज्ज, पूर परिस्थितीत प्रशासन मदतीसाठी फिल्डवर ; बचाव कार्य व्यवस्थित सुरू – मुख्यमंत्री
– लोणावळा धरण ओव्हरफ्लो ! इंद्रायणी नदीत पाण्याचा विसर्ग सुरू, लोणावळा शहरातील नागरिकांना खबरदारीचा इशारा । Lonavala Dam News
– पवना धरणावरील जलविद्युत प्रकल्प सुरू ठेवावा, पालकमंत्री अजित पवार यांच्या सुचना । Pavana Dam News


Previous Post

मुसळधार पावसाचा इशारा असल्याने सर्व शाळांना शुक्रवारी देखील सुटी जाहीर । Pune News

Next Post

पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News

Team Dainik Maval

Team Dainik Maval

Dainik Maval is a leading media house in the Maval Taluka. We focus on all types of news : Political, Social, Educational etc. Covering Maval Taluka And Areas of Pune City, District as well. Currently, we are focusing on Web-based, Video-based Content. In the last One Year, Dainik Maval is the most read news portal in the Maval Taluka according to the official statistics of Google.

Next Post
Cracks fell on road

पावसाचा कहर ! किल्ले राजमाची मार्गावर दरड कोसळली, किल्ले लोहगडाच्या रस्त्याला तडे । Maval News

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

Action taken by Talegaon traffic police on vehicles with black glass

मावळात काळ्या काचा अन् फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांची संख्या वाढली ; एलईडी दिव्यांमुळे होताहेत अपघात

March 13, 2026
Truck transporting fish overturns on Mumbai-Pune Expressway

मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर मासे वाहतूक करणारा ट्रक पलटी

March 13, 2026
Pistol selling gang busted Police raid in Somatane Phata Maval area three accused arrested

पिस्तूल विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश ; सोमाटणे फाटा परिसरात पोलिसांची धडक कारवाई, तीन आरोपी गजाआड

March 13, 2026
Girl-Committed-Suicide

सततच्या त्रासाला कंटाळून अल्पवयीन मुलीची आत्म’हत्या ; मावळमधील गंभीर प्रकार

March 13, 2026
Guidance from Shirota Forest Department to students of Nane Nanoli and Sai villages Maval

महत्वाची बातमी ! शालेय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी कडक नियमावली जारी ; नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई

March 13, 2026
LPG-Gas

पुणे जिल्ह्यात गॅस सिलिंडरचा पुरेसा साठा, अफवांवर विश्वास ठेवू नका – जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांचे नागरिकांना आवाहन

March 13, 2026
  • Contact us
  • Fact-Checking Policy
  • Home
  • Ownership & Funding Info
  • Privacy Policy
  • Video

© 2023 Website Design by Tushar Bhambare.

Welcome Back!

Login to your account below

Forgotten Password?

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.

Log In
error: Content is protected !!
No Result
View All Result
  • होम
  • लोकल
    • ग्रामीण
    • शहर
  • पुणे
    • ग्रामीण
    • शहर
  • महाराष्ट्र
  • देश-विदेश
  • मावळकट्टा
  • व्हिडीओ

© 2023 Website Design by Tushar Bhambare.