कार्तिकी यात्रेसाठी कोल्हापूरहून पंढरपूरकडे पायी निघालेल्या 8 वारकऱ्यांना एका भरधाव कारने चिरडले. सांगोला तालुक्यातील जुनोनी गावाजवळ सोमवारी (31 ऑक्टोबर) सायंकाळी उशीरा हा अपघात घडला. या भयंकर अपघातात 8 वारकऱ्यांचा मृत्यू झाला असून अन्य 6 वारकरी गंभीर जखमी आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या दुर्घटनेवर शोक व्यक्त केला असून मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी 5 लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील घोषणा केली आहे.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
या अपघाताचे वृत्त कळताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तातडीने जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधला. तसेच या घटनेतील जखमी वारकऱ्यांना ताबडतोब योग्य ते उपचार देण्यात यावे असे निर्देश दिले. हा अपघात कसा झाला याविषयी तातडीने चौकशी करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. ( 8 Warkari Died In Road Accident At Sangola Taluka Solapur Who Were Going To Visit Shri Vitthal Temple Pandharpur )
हेही वाचा – Video : पोहण्याचा मोह जीवावर बेतला, आडगाव येथे 2 मुलांचा बुडून मृत्यू
कार्तिकी यात्रेसाठी पंढरपूरकडे पायी निघालेल्या वारकऱ्यांना सांगोला-मिरज मार्गावर वाहनाने चिरडल्यामुळे झालेल्या दुर्घटनेबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शोक व्यक्त केला आहे. दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबिंयांना प्रत्येकी ५ लाख रुपये तातडीच्या मदतीची देखील त्यांनी घोषणा केली आहे.
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) October 31, 2022
नेमकं काय घडलं?
कोल्हापुरातील वारकऱ्यांची दिंडी सोमवारी सायंकाळी 7 वाजता सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील बायपास रस्त्याजवळ आली असता मिरजेकडून भरधाव वेगाने येणारी एमएच 12 डीई 7938 ही टाटा नेक्सॉन कार दिंडीत घुसली आणि वारकऱ्यांना चिरडत पुढे जाऊन थांबली.
कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळ्याच्या पायथ्याशी असणाऱ्या जठारवाडी गावातील या दिंडीमध्ये एकूण 32 वारकरी होते. या अपघातात 5 महिला, 2 पुरुष आणि 1 लहान मुलाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
अधिक वाचा –
– वडगावमध्ये भक्तीमय वातावरणात सुरु आहे काकडा आरती सोहळा
– आमदार सुनिल शेळकेंची मावळमधील अतिदुर्गम गावात भेट, कळकराई ग्रामस्थांची दिवाळी केली गोड