पवनानगर (ता. मावळ) इथे तब्बल 9 फुटी अजगर जातीच्या सापाला सर्पमित्रांनी जीवदान दिले. पवनानगर येथील काशिनाथ डोंगरे आणि संतोष घरदाळे यांनी वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर आणि रमेश कुमार यांना फोन केला की, आंबेगाव येथील शेतकरी शिवाजी राजीवडे आणि त्यांचे सहकारी गाईसाठी चारा आणण्यासाठी गेले असता, म्हणजेच गवत कापत असताना गाईच्या गोठ्याजवळ एक भला मोठा साप दिसला आहे. ( 9 feet python found in Pavananagar )
असा फोन येताच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे सदस्य शत्रुघ्न रासनकर आणि रमेश कुमार हे त्या ठिकाणी पोहोचले आणि साप कुठे आहे, याची पाहाणी केली. तेव्हा त्यांना जवळ एक मोठा अजगर दिसून आला. त्यांनी लगेचच याची माहिती वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे संस्थापक निलेश गराडे यांना दिली. तसेच अध्यक्ष अनिल आंद्रे यांनाही याची माहिती दिली. जवळ गाईचा गोठा असल्यामुळे त्या अजगराला पकडून परत जंगलात सोडून देण्याचे ठरले. ( sarpmitra saved snake life see video )
निलेश गराडे यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी हनुमंत जाधव यांना हि माहिती दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली गाईच्या गोठ्या जवळील अजगराला पकडून सुरक्षितरित्या पुन्हा जंगलात सोडण्यात आले. हा अजगर तब्बल 9 फुट लांब होता आणि नर जातीचा होता, अशी माहिती गराडे यांनी दिली. यावेळी वनसेवक गफुर शेख, ईफान शेख, शभीर शेख, विशाल सुतार तसेच वन्यजीव रक्षक मावळ संस्थेचे निलेश गराडे, अनिल आंद्रे, प्रमोद ओव्हाळ, शत्रुघ्न रासनकर, रमेश कुमार, संतोष दहीभाते, सोमनाथ चौधरी, उमेश साळवे, विनोद मोरे, नागेश कदम, नयन कदम, सुरज शिंदे, रोहन ओव्हाळ आदीजण होते.
दैनिक मावळचा व्हॉट्सअॅप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक वाचा –
– तब्बल 11 वेळा आमदार राहिलेल्या गणपतराव देशमुख यांच्या जीवनावर येतोय ‘कर्मयोगी आबासाहेब’ चित्रपट
– पोस्ट कार्यालय आले दारी…! पवन मावळातील किल्ले तुंग परिसरातील नागरिकांसाठी प्रथमच स्वतंत्र पोस्ट कार्यालय
– आपला बाप्पा आपणच बनवुया..! कामशेतमध्ये विद्यार्थ्यांसाठी गणेशमूर्ती प्रशिक्षण शिबिर, चिमुकल्या हातांनी साकारले आकर्षक गणपती